शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

रत्नागिरी : पाच दिवसात पावणेपाच टन प्लास्टिक जप्त, सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:57 PM

रत्नागिरी शहरात सलग पाच दिवस टाकलेल्या छाप्यात तब्बल पावणेपाच टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. मात्र, प्लास्टिक पिशव्यांसाठी पर्यायी पिशव्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची व्यापाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येत्या १ सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणार आहे.

ठळक मुद्देपाच दिवसात पावणेपाच टन प्लास्टिक जप्तरत्नागिरीत १ सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणारसंयुक्त सभेत उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात सलग पाच दिवस टाकलेल्या छाप्यात तब्बल पावणेपाच टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये अद्याप टनावारी प्लास्टिक पिशव्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्लास्टिक पिशव्यांसाठी पर्यायी पिशव्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची व्यापाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येत्या १ सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणार आहे. हा निर्णय मंगळवारी येथे झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत आमदार उदय सामंत यांनी जाहीर केला.रत्नागिरी शहरात टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल पावणेपाच टन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व वस्तू जप्त करण्यात आल्या. रत्नागिरी नगर परिषदेच्या भरारी पथकातील कर्मचारी दादागिरी करतात. प्रतिबंधित नसलेल्या प्लास्टिक पिशव्या, वस्तू जप्त करतात, अशी व्यापाऱ्यांची तक्रार होती.याबाबत चर्चेतून निर्णय घेण्यासाठी बुधवारी दुपारी १२.३० वाजता नगर परिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहात शहरातील व्यापारी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त सभा आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाली. नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उदय पेठे व शहरातील व्यापारी उपस्थित होते.या सभेत प्लास्टिक बंदीमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आहेत व कोणत्या नाहीत, याबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन करताना आमदार उदय सामंत म्हणाले, व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर येत्या १ सप्टेंबरपर्यंत भरारी पथकामार्फत शहरात सुरू असलेल्या छापासत्र थांबवाव्यात, अशी सूचना आपण नगर परिषदेला केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडील प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा परत करण्यास किंवा पुनर्प्रक्रियेसाठी देण्यास यामुळे अवधी मिळेल.वेफर्स पिशव्यांची मोठी समस्यारिसायकलेबल म्हणून वेफर्स, चिप्स व विविध खाद्यवस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे पर्यावरणासाठी सर्वात मोठे संकट निर्माण झाले आहे. या प्लास्टिकच्या पिशव्या रिसायकलेबल असल्या तरी त्या परत घेतल्याच जात नाहीत, त्यावर पुनर्प्रक्रियाही होत नाही. त्यामुळे या पिशव्यांचा सर्वाधिक कचरा ही मोठी समस्या बनली आहे. व्यापाऱ्यांना या नियमाची माहिती द्यावी आणि त्याची कडक अंमलबजावणी व्हावी. त्याबाबत कारवाई होणार की नाही, असा सवाल रत्नागिरीतील नागरिकांमधून केला जात आहे....त्या पिशव्या परत करणाररत्नागिरी शहरात भरारी पथकाने कारवाई करताना काही व्यापाऱ्यांकडील ५० मायक्रॉनवरील पॉलिथीन पिशव्या जप्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चुकीची कारवाई झाली आहे. त्यामुळे या पिशव्या संबंधित व्यापाऱ्यांना परत केल्या जातील, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRatnagiriरत्नागिरी