शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

रत्नागिरी : गोशाळांचा मंजूर निधी अडकला लालफितीत, पावसाळ्यापूर्वी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 7:06 PM

खेड तालुक्यातील लोटे येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळेला शासनाने मंजूर केलेला १ कोटीचा निधी अद्यापही न मिळाल्याने येथील ४७५ गायी व त्यांच्या वासरांच्या चाऱ्याचा व निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

ठळक मुद्देगोवंशाचे पुनर्वसन व त्यांचे पालनपोषण करण्याचे कामलोटे येथे १० वर्षांपासून भगवान कोकरे चालवत आहेत गोशाळा

चिपळूण : गायी थकल्या-भागल्या, अपघातात जखमी झाल्या किंवा भाकड झाल्या तर त्यांना सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण होते. त्यामुळे अशा गोवंशाचे पुनर्वसन व त्यांचे पालनपोषण खेड तालुक्यातील लोटे येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळेत केले जाते. या गोशाळेला शासनाने मंजूर केलेला १ कोटीचा निधी अद्यापही न मिळाल्याने येथील ४७५ गायी व त्यांच्या वासरांच्या चाऱ्याचा व निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.लोटे येथे गेल्या १० वर्षांपासून भगवान कोकरे यांनी पत्र्याच्या शेडमध्ये गोशाळा सुरु केली. या १० वर्षात अनेक भाकड गायी, अपघातग्रस्त जनावरे, शेतकऱ्यांना नको असलेली व चाऱ्या, पाण्यापासून भटकणाऱ्या जनावरांना संस्थेने स्वखर्चाने किंवा काहीवेळा शेतकऱ्यांच्या मदतीने गोशाळेत आणले. त्याठिकाणी त्यांचे संगोपन केले जावू लागले.

सुरुवातीला ही संख्या २५० पर्यंत होती. परंतु, त्यानंतर शासनाने गोशाळांना अनुदान देण्याची घोषणा केल्याने या गोशाळेची मर्यादा वाढविण्यात आली. त्यामुळे येथे आता ४७५पेक्षा जास्त गायी व त्यांची वासरे आहेत. त्यांना दररोज वैरण, चारापेंढी, ओला चारा, कडबाकुट्टी, पेंड, भुशी, पाणी द्यावे लागते.

यासाठी दिवसाला किमान १८ हजार रुपये खर्च येतो. यातील २५०पेक्षा जास्त गायींना निवाराशेड नसल्याने सध्या शेडनेट लावून त्याखाली त्यांना बांधले जाते. आता उन्हाळ्यात ही स्थिती असून, पावसाळ्यात कसे दिवस जातील, याचीच चिंता संस्थानला लागून राहिली आहे.कोकणात मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात गायींच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. अशावेळी या गोवंशाचे करायचे काय? असा प्रश्न गोशाळा संचालकांसमोर आहे. पावसाळ्यापूर्वी या गोशाळेची प्रलंबित कामे पूर्ण झाली नाहीत तर या गोवंशाचे करायचे काय? त्यांना ठेवायचे कुठे? हा प्रश्न संचालकांसमोर आहे.

संस्थेचे अध्यक्ष भगवान कोकरे हे आपल्यापरीने यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असला तरी अपेक्षित यश मिळत नाही, शासनाने पावसाळ्यापूर्वी गोशाळेसाठी निधी उपलब्ध करुन येथील गोधनाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.दानशुरांचा आखडता हातगायींच्या रक्षणासाठी ४० बाय १५० फुटाची शेड बांधण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी ३५ लाख रुपये खर्च येणार आहे. शासनाने मंजूर केलेल्या अनुदानापैकी अद्याप १ रुपयाही मिळालेला नाही. दानशूर व्यक्तींनीही आता शासनाकडून निधी मिळणार म्हणून हात आखडता घेतला आहे.

टॅग्स :cowगायRatnagiriरत्नागिरी