शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

अन् प्रीतमच्या चेहऱ्यावर उमटले हास्य, रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनची वाढदिनी ‘अनोखी भेट’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 4:58 PM

कशेळीच्या देवघळ पॉईंटवर शंभर पायऱ्यांवरून व्हीलचेअरद्वारे खाली न्यायचे आणि पुन्हा वर आणायचे हे एक दिव्यच होते.

रत्नागिरी : सर्वसामान्य आणि धडधाकट माणूस कुठेही, कधीही फिरायला जाऊ शकतो. मात्र, पर्यटनाच्या आनंदापासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहतात. त्यांना टीव्ही, मोबाईलवर शूटिंग पाहून किंवा छायाचित्रे पाहून आनंद घ्यावा लागतो. उंच डोंगरावरून दिसणारा अथांग समुद्र, वारा आणि निळे आकाश पाहण्याची ‘अनोखी भेट’ रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने प्रीतम उदय कदम या सदस्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त दिले.

प्रीतमच्या वाढदिवसाला कशेळीच्या देवघळ पॉईंटवर व्हीलचेअरवरून पायऱ्या उतरून नेण्यात आले. त्याला नेताना हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची काही प्रमाणात दमछाक झाली. मात्र, या पॉईंटवर पोहोचल्यावर प्रीतमच्या चेहेऱ्यावरील आनंद पाहून सदस्यांचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला.सेरेब्रल पाल्सी आजार असलेल्या प्रीतमच्या मेंदूवर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली असून, कमरेखाली अपंग असल्याने व्हीलचेअरमुळे तो फिरतो. प्रीतमने दहावी, बारावीचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला घरात असणाऱ्या प्रीतमला रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी त्याला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली. त्याचा आत्मविश्वास वाढला. प्रीतम पानपट्टी चालवितो. आजारपणामुळे प्रीतम कुठेही पर्यटनाला जाऊ शकलेला नसल्याचे कळल्यावर रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रीतमचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले.

वाढदिवसादिवशी प्रीतमला कशेळी गावी नेण्यात आले. तेथील अथांग समुद्र, किनाऱ्यावर येताना फेसाळणाऱ्या लाटा आणि त्याचे विराट रूप पाहून प्रीतम हरकला. शंभर पायऱ्यांवरून व्हीलचेअरद्वारे खाली न्यायचे आणि पुन्हा वर आणायचे हे एक दिव्यच होते. परंतु, सादिक यांचे भाऊ समीर नाकाडे यांनी ही जबाबदारी पार पाडली. प्रीतमसोबत प्रिया बेर्डे, कशेळीतील तेजस फोडकर, त्याचा मित्र श्रीपाद पाटील मदतीला होते.देवघळ पॉईंटवरून दिसणारे विलोभनीय दृश्य पाहून प्रीतम आनंदला. दोन्ही बाजूला डोंगरदऱ्या आणि मधल्या भागातील समुद्र व हे सृष्टीसौंदर्य पाहण्यासाठी कशेळी ग्रामपंचायतीने केलेल्या सुविधेचा लाभ झाल्याचे प्रीतमने सांगितले. दिव्यांगांकरिता नेहमीच कार्यरत व मदतीसाठी तत्पर असणाऱ्या रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे दिलेल्या अनोख्या भेटीबद्दल प्रीतमने कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी