रत्नागिरी : आपल्या अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असणारा रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चव आता दिल्लीवासीयांना चाखता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कंपनीकडून शेतकऱ्यांकडून थेट आंबा खरेदी सुरू आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात १५० पेट्या हापूस आंबा दिल्लीला पाठविण्यात येणार आहे.मुंबईच्या बाजारात पसंती मिळाल्यानंतर आता दिल्लीच्या बाजारपेठेत रत्नागिरीचा सेंद्रिय हापूस पाठविण्यात येणार आहे. रासायनिक खते, कीटकनाशके याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यामुळे कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरातील शेतकºयांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला आंबा काढणीयोग्य झाला असून, त्याची तोडणी सुरू झाली आहे.या सेंद्रिय आंब्यासाठी दर निश्चित करण्यात आला असून थेट शेतकºयांकडून आंबा खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकºयांचा वाहतूक खर्च, हमाली, दलालीचा खर्च वाचला आहे. घरबसल्या शेतकºयांना आंबा विक्रीतून चांगला दर मिळत आहे. सेंद्रिय आंब्याला मुंबईतील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आंबा दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. मुलुंडच्या अनघा सावंत यांच्या मदतीने राजधानी एक्स्प्रेसमधून हा आंबा दिल्ली बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. यासाठी १०० किलोमागे ६५० रुपये वाहतूक खर्च व ८० रुपये हमालीसाठी खर्च येणार आहे.पहिल्या टप्प्यात आंब्याच्या १०० पेट्या मुंबईला!रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकºयांच्या कंपनीतर्फे हापूस आंब्याच्या आलेल्या मागणीच्या नोंदणीनुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून शंभर पेट्या मुंबईला पाठविण्यात आल्या होत्या. सेंद्रिय आंब्यासाठी आता दिल्ली येथून मागणी आली आहे.
दिल्लीवासींना चाखता येणार रत्नागिरी हापूस आंब्याची चव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 5:31 AM