राजापूर : रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, नाणारचा विषय आता संपलाय हवा अशी भूमिका मांडणारी शिवसेना आजही सत्तेत असताना शासन हा प्रकल्प कसा काय रेटवण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबतचे प्रश्न शिवसेनेचे पक्षप्रमुखांसह त्यांच्या लोकप्रतिनिधीनांच विचारा, अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राजापूर येथे पत्रकारांशी बोलताना मांडली.
आपण नाणारवासीयांच्या सोबत राहू व या प्रकल्पाबाबत पुढे काय करायचे त्याचा निर्णय आमच्या पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन ठरवू, असेही त्यांनी सांगितले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संघटनात्मक पातळीवरील राज्यव्यापी दौरा सुरु झाला आहे. गुरुवारी ते राजापुरात आले होते. महामार्गावरील गुरुमाऊली येथील हॉटेलवर त्यांनी नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केले.सेनेच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी बोट ठेवले. नाणारवासियांच्या शिवसेनेकडून अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण न झाल्याने मनसे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार का, असे विचारले असता आम्ही नाणारवासीयांच्या समवेत आहोत व आता पुढे कसे करायचे ते लवकरच ठरवू, असे सांगितले.