रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्ग काल रात्री नाणीज हायस्कूलजवळ खचला. त्यात एक ट्रक रुतून बसला. त्यामुळे सारी वाहने अडकून पडली. येथील रस्ता दुरुस्तीपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी वाहतूक लांजा- दाभोळमार्गे सुरू करण्यात आली आहे.या महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. रस्ता अनेक ठिकाणी उखडून ठेवला आहे. रात्री १२:३० च्या दरम्यान हा रस्ता खचला. त्यात दोन वाहने रुतून बसली. ती बाजूला करण्यासाठी क्रेन आणली. तीही तिथे फसली. या सर्व प्रकारामुळे सर्व वाहने दुतर्फा अडकून पडली. रात्रीच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी छोटी वाहने चोरवणे मार्गे सोडण्यास सुरुवात केली आहे. मोठी वाहने मात्र जाग्यावरच अडकून पडली होती. आता येथील रस्ता दुरुस्त होईपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक लांजा- दाभोळ मार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्गच्या अधिकारी व कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम केल्याने राज्यमहामहामार्ग १६६ यावर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून रस्ता सुरळीत सुरू झाला आहे
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग सुरू, 'या' मार्गावरुन वळविण्यात आली वाहतूक; नाणीज हायस्कूलजवळ खचला होता रस्ता
By मनोज मुळ्ये | Published: June 30, 2023 12:54 PM