रत्नागिरी : सुमारे दहा वर्षांच्या कालखंडात अनेकजण आले, अनेकजण सोडून गेले. पण अडचणीच्या काळात ज्यांनी साथ दिली ते खरे निष्ठावंत! कोणताही पक्ष कधी संपत नसतो, मनसेलादेखील अच्छे दिन येतील, मात्र, थोडा संयम ठेवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले.रत्नागिरीतील जे. के. फाईल येथील साईमंगल कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनविसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नीलेश सावंत, मुंबई विद्यापीठ माजी सिनेट सदस्य गणेश चव्हाण, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख अमोल साळुंखे, जितेंद्र चव्हाण, सुनील साळवी, छोटू खामकर, सिद्धेश धुळप, गुरूप्रसाद चव्हाण उपस्थित होते.वैभव खेडेकर यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. व्यासपीठावरील उपस्थितांना रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेडेकर म्हणाले की, मी घडलो तो विद्यार्थी सेनेतूनच घडलो. तुमचासारखा सामान्य कुटुंबातील होतो. माझ्या मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. माझ्या घरात कोणताही ग्रामपंचायत सदस्य नव्हता. आपल्यासारख्या प्रामाणिक युवकांना घेऊन मी सामाजिक कार्याला सुरूवात केली. विद्यार्थी सेनेत काम करताना कोणतेही कार्यक्षेत्र नसते, असे ते म्हणाले.पक्षाच्या हिताचे कोणतेही प्रश्न घेऊन आपण आंदोलन छेडले तर ते पक्षाच्या ध्येय धोरणातील एक प्रकार असेल. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच आपल्या जीवनात समाजकारणाची सुरूवात होते. यावेळी अनेक राजकीय पक्षांशी संबंध येतो. याच काळात आपल्यातील नेतृत्व घडवण्याची सुरुवात विद्यार्थी सेनेतून होते. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यात विद्यार्थी सेना महत्त्वाची भूमिका बजावते, असे वैभव खेडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिपीन शिंदे यांनी केले.अनेकांचा प्रवेशमहाराष्ट्र नवनिर्माण सेना मजबूत करण्यासाठी विद्यार्थी सेनेपासूनच सुरूवात करण्यात येत आहे. त्यामुळे या मेळाव्यात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला. आयटीआय, गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, लोकनेते श्यामरावजी पेजे महाविद्यालय, शिवारआंबेरे आणि नवनिर्माण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनविसेत प्रवेश केला.
रत्नागिरी : मनविसेनेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा, अडचणीच्या काळात साथ देणारे खरे निष्ठावंत : वैभव खेडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 2:13 PM
सुमारे दहा वर्षांच्या कालखंडात अनेकजण आले, अनेकजण सोडून गेले. पण अडचणीच्या काळात ज्यांनी साथ दिली ते खरे निष्ठावंत! कोणताही पक्ष कधी संपत नसतो, मनसेलादेखील अच्छे दिन येतील, मात्र, थोडा संयम ठेवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले.
ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा मेळाव्यात २०० विद्यार्थ्यांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश