रत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या मोबदल्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या रकमेच्या वाटप प्रक्रियेला २ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यालयाकडून संगमेश्वर तालुक्यातील १३ गावांमधील एकूण १३,३६,८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील १४ गावांमधील ६,५२,२२० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील दहा अशा एकूण १६ गावांतील जमीनमालकांचे मोबदला निवाडेही फेब्रुवारी २०१९ मध्ये झाले आहेत. या निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी आहे. या निवाड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता.
तब्बल एक वर्षानंतर म्हणजेच, फेब्रुवारी २०२० मध्ये केवळ रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रूपये प्राधिकरणाकडून येथील उपविभागीय कार्यालयाकडे फेब्रुवारी अखेर प्राप्त झाला आहे. मात्र, कोरोना संकटामुळे निधी वाटप खोळंबले होते.आता ही प्रक्रिया सुरू झाली असून, खातेदारांना नोटीस आणि बँकेच्या खाते क्रमांकाबरोबरच इतर माहितीसाठी अर्ज पाठविण्यात आला आहे. २ सप्टेंबरपासून मोबदला वाटप प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. या खातेदारांना तारखांनुसार त्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये बोलावण्यात येणार आहे. कोरोनामुळे प्रत्येक दिवशी ५० खातेदारांना बोलाविले जाणार आहे.लोकमतकडून सातत्याने पाठपुरावारत्नागिरी जिल्ह्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा आणि पानवल या सहा गावांसाठी ६९ कोटी २० लाख ७२ हजार रूपये प्रांत कार्यालयाकडे फेब्रुवारीत आले आहेत. कोरोनामुळे वाटप प्रक्रिया थांबली होती. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला.