शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

रत्नागिरी : पर्ससीन-पारंपरिक वाद, मच्छीमारांमध्ये खटका; मत्स्य उत्पादनाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 4:43 PM

पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद, आंदोलने आणि ओखी वादळासह अनेक नैसर्गिक संकटे यांचा परिणाम जिल्ह्यातील सागरी मत्स्योत्पादनावर झाला आहे. सन २०१८मधील मत्स्य उत्पादनात गतवर्षीपेक्षा घट झाल्याचे मच्छीमारांमधून सांगण्यात येत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने बाजारातील मच्छीचे दरही सातत्याने तेजीत राहिले.

ठळक मुद्देओखी वादळामुळेही मासळी घटलीमागणीपेक्षा पुरवठा कमी, मच्छीचे दरही सातत्याने तेजीत२०१८मधील मत्स्य उत्पादनात गतवर्षीपेक्षा घट फेब्रुवारी २०१६पासून पर्ससीन मासेमारीवर बंदी

रत्नागिरी : पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद, आंदोलने आणि ओखी वादळासह अनेक नैसर्गिक संकटे यांचा परिणाम जिल्ह्यातील सागरी मत्स्योत्पादनावर झाला आहे. सन २०१८ मधील मत्स्य उत्पादनात गतवर्षीपेक्षा घट झाल्याचे मच्छीमारांमधून सांगण्यात येत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने बाजारातील मच्छीचे दरही सातत्याने तेजीत राहिले.पर्ससीन व पारंपरिक मच्छीमारांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी शासनाने काही कायदे केले आहेत. हे कायदे झाले असले तरी योग्य अंमलबजावणी होत नसल्याने ते कागदावरच राहिल्याच्या प्रतिक्रिया पारंपरिक मच्छीमारांमधून व्यक्त होत आहेत.

गेल्या काही वर्षात पर्ससीन मासेमारी नौकांनी सागरातील मत्स्यबीजच नष्ट केल्याने चालू हंगामात मत्स्योत्पादन कमी झाल्याचा दावा पारंपरिक मच्छीमारांमधून केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने मच्छीमारीला पारंपरिक मच्छीमारांचा सतत विरोध होत असल्यानेच मत्स्य उत्पादनात घट झाली आहे, असा आरोप पर्ससीन, एलईडी मच्छीमारांमधून केला जात आहे.गेल्या काही वर्षांपासून कोकण किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातही पारंपरिक व पर्ससीन - एलईडी मच्छीमारांमध्ये सागरी मासेमारी हद्दीवरून जोरदार संघर्ष सुरू आहे. सागरी मासेमारीचा गेल्या दहा वर्षांतील आढावा घेता अनेक संकटांमधून हा व्यवसाय मार्गक्रमण करीत आहे. त्यातच पर्ससीन या आधुनिक मासेमारी प्रकारामुळे सागरातील मासे गाळून काढले जातात. त्यामुळे या मासेमारीवर बंदी घालावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांकडून गेल्या दोन दशकांपासून सुरू होती.राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आल्यानंतर पर्ससीन बंदीबाबत पारंपरिक मच्छीमारांची मागणी अंशत: मान्य करण्यात आली. त्यानुसार फेब्रुवारी २०१६पासून १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या ८ महिन्यांच्या काळासाठी पर्ससीन मासेमारीवर राज्य सरकारने बंदी घातली, तर १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांसाठी पर्ससीन मासेमारीला परवानगी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील संघर्ष संपलेला नाही.मत्स्य उत्पादन गतवर्षीपेक्षा घटरत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीचा गेल्या ५ वर्षांमधील आढावा घेता २०१२-१३ ते २०१४-१५ या तीन वर्षांच्या काळात मत्स्य उत्पादनाचा आलेख उंचावला होता. मात्र, सन २०१५-१६मध्ये मत्स्योत्पादन २५ टक्क्यांनी घसरून ते ७६,९०० मेट्रिक टनावर आले.

त्यानंतर २०१६-१७ या वर्षात मत्स्योत्पादन पुन्हा २१ टक्क्यांनी वाढून ते ९८,४३३ मेट्रिक टन झाले. मात्र, सन २०१७-१८ या वर्षात ओखी वादळासह अनेक नैसर्गिक संकटे आणि पर्ससीन व पारंपरिक मच्छीमार यांच्यातील संघर्षामुळे मत्स्योत्पादन गतवर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. हा हंगाम आता ३१ मे रोजी संपणार आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार