रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची ठाणे (ग्रामीण) येथे बदली करण्यात आली आहे. विनीत चौधरी यांनी रत्नागिरी येथील कार्यकालात अनेक गुन्ह्यांचा छडा लावला होता.अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी सखोल अभ्यास करून, गुन्ह्यांचा तपास करून दोषारोपपत्र सादर केले होते.
महिला, लहान मुले यांच्यासंदर्भात होणाऱ्या अत्याचारांबाबत ते कमालीची जागरुकता दाखवत तसेच अशा आरोपींच्या प्रति दयामाया न दाखवता, आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी सखोल अभ्यास करून गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांनी तत्परता दाखवली.
रत्नागिरीत काही महिन्यांपूर्वी घडलेल्या ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणातदेखील संबंधित डॉक्टरांवर ३०४चा गुन्हा दाखल करून कायद्यासमोर सर्व समान आहेत, हे दाखवून दिले.या प्रकरणाच्या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीदरम्याने पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी न्यायालयासमोर जी वस्तूस्थिती मांडली ती वाखाणण्याजोगी होती. कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कायद्याच्या चौकटीत पोलीस स्थानकाचा कारभार चालविण्याला ते नेहमीच प्राधान्य देत असत.
याच कारणास्तव पोलीस निरीक्षक विनीत चौधरी हे अनेकांना अडसर बनले होते. त्यांच्या बदलीसाठी उच्चस्तरावरुनही दबाव येत असल्याची चर्चा असतानाच गुरुवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले.शिताफीने तपासगंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शासन होण्यासाठी विनीत चौधरी यांचे प्रयत्न असत. रत्नागिरीतील अनेक गुन्ह्यांचा त्यांनी मोठ्या शिताफीने तपास करून गुन्ह्यांना ताब्यात घेतला आहे.