शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीत पक्षानुसार नव्हे, उमेदवारानुसार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 4:54 PM

गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आता पक्षपातळीवरील न राहता आपल्या प्रभागातील उमेदवार कोण, यावर मतदार आपले मत कुठे देणार, हे ठरवू लागला आहे. या निवडणुकीला जातीयतेचा रंग चढल्याने व निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या संघर्षातून घराघरात वाद होताना दिसत आहे.

ठळक मुद्देगुहागर नगरपंचायतीत पक्षानुसार नव्हेउमेदवारानुसार मतदान

संकेत गोयथळेगुहागर : गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आता पक्षपातळीवरील न राहता आपल्या प्रभागातील उमेदवार कोण, यावर मतदार आपले मत कुठे देणार, हे ठरवू लागला आहे. या निवडणुकीला जातीयतेचा रंग चढल्याने व निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या संघर्षातून घराघरात वाद होताना दिसत आहे.वर्षभरापूर्वीच कुणबी समाजाने राष्ट्रवादीविरोधी बंड पुकारल्याने या गुहागर निवडणुकीत जातीयतेचा रंग चढणार, हे निश्चित झाले होते. प्रत्यक्षातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका प्रामुख्याने राष्ट्रवादीसह भाजपलाही बसला आहे. परंतु, दोन्ही पक्षांची या निवडणुकीतील भूमिका मात्र भिन्न आहे. नगरपंचायतमध्ये झालेली कोट्यवधींची कामेच राष्ट्रवादीच्या मुळावर येत आहेत.

या वादातूनच कुणबी समाजाने बंड पुकारला. एवढेच नव्हे तर काही राष्ट्रवादी कार्यकर्तेही यामुळे दुरावलेले दिसत आहेत. तरीही न डगमगता राष्ट्रवदीने १७ जागांवर उमेदवार देऊन आम्ही लढण्यासाठी तयार आहोत, असे जाहीर आव्हान दिले. भाजपची या निवडणुकीतील भूमिका मात्र दुटप्पीपणाची दिसून येत आहे.

काही महिने आधीच आघाडीसोबत भाजपची चर्चा चालू होती. राष्ट्रवादी पक्ष असल्याने कमळ चिन्हावरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक लढवेल, या भाजपच्या ठाम भूमिकेवरुन प्रत्यक्षात आघाडी होऊ शकली नाही. शिवसेनेने मात्र आता वॉर्ड २ व वॉर्ड १२ मधून दोनच उमेदवार उभे केले आहेत.कुणबी समाजातील मोठा गट हा राष्ट्रवादी व भाजप समर्थक आहे. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत आघाडी होऊ न शकल्याने राष्ट्रवादीसह भाजपही आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना गोंजारुन मते वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यातून इतकी वर्ष ज्या पक्षाबरोबर आपण ठाम राहिलो, खांद्याला खांदा लावून कामे केली त्या पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा साद घालत असताना या कार्यकर्त्यांचा जीव कासावीस होत आहे.

अनेक ठिकाणी घराघरातून वाद होण्याची स्थिती येऊन ठेपली आहे. कारण एकाच घरातील दोघे भाऊ दोन पक्षात तर काही ठिकाणी वडील-मुलगा एकमेकांसमोर उभे राहिल्याने नात्यातील ओलावा संपून राजकीय द्वंद्व होते की काय, अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.पक्षपातळीवरील निवडणुकीची रणनिती लक्षात घेता, सर्वसामान्य लोकांना न समजणारी आहे. काही वॉर्डमधून भाजपला अंतर्गत सहकार्य करुन आपले उमेदवार कसे निवडून येतील, याची चर्चा होताना दिसत आहे. यामधून पक्षनिष्ठेने काम करणारा सामान्य कार्यकर्ता व मतदारही भांबावलेला दिसून येत आहे.

राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे या पक्षाचे संघटन मात्र धोक्यात येऊ शकते याची काळजी न करता, गुहागरच्या निवडणुकीसाठी काहीही अशा भूमिकेत पक्ष नेतृत्व काम करताना दिसत आहे.मतदार संभ्रमितदबावाच्या राजकारणात मतदार मात्र चांगलाच संभ्रमित झाला आहे. मतदान कुणाला करावे, हे सांगताना आपल्या उमेदवारला मतदान केले नाहीत तर लगेचच आम्हाला कळेल, अशी यंत्रणा आमच्याकडे आहे, असे सांगून मतदाराच्या भोळेपणाचा फायदाही घेतला जात आहे. उमेदवार म्हणून आपण कसे आहोत व मतदानाचे आव्हान करताना आपली ध्येयधोरणे काय? वॉर्डातील विकासाचा आराखडा काय आहे, याचा प्रचार केला जात नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक