रत्नागिरी : मुग्धनाद अकादमीच्या मंथन गुरुपौर्णिमा कार्यक्रमाने रसिकांना सहा तास खिळवून ठेवले. (कै.) गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी मुग्धा भट-सामंत यांच्या सर्व वयोगटातील शिष्यांनी बंदिशी, ताना, आलाप, शीर्षकगीते, नांदी सादर करून रसिकांची मने जिंकली.प्रारंभी मुग्धा भट-सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून (कै.) गजानन भट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमात सर्व वयोगटातील शिष्यांनी शास्त्रीय राग व त्या रागात येणारी गीते सादर केली.आडाचौताल, मत्तताल, झपताल, रूपक या तालातील बंदिशी सादर करण्यात आल्या. बिहाग, पुरियाधानाश्री, भीमपलासी, चारुकेशी, यमन, सारंग, कलावती अशा विविध रागातील बंदिशी सादर केल्या. लहान मुलांनी ह्यसंगीत शाकुंतल, सौभद्र, मानापमान व मूकनायकह्ण या नाटकातील नांदी सुरेल आवाजात सादर केल्या.
याबरोबर देस आणि खमाज रागातील आलाप ताना सादर केल्या. कार्यक्रमाची सांगता अमजद अली खाँ साहेबांनी रचनाबद्ध केलेल्या सरगमने करण्यात आली. पहिली ते चौथी या वयोगटातील मुलांनी ह्यशिवस्तुतिताण्डवह्ण स्तोत्रामधील उच्चारास अतिशय अवघड असे १५ संस्कृत श्लोक सादर केले.