शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

रत्नागिरी : कोकण परिमंडलांतर्गत महावितरणकडून विक्रमी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 5:47 PM

सध्या महावितरणने वसुली मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून ७ कोटी २८ लाख २३ हजार रूपयांचीे वसुली करण्यात आली आहे. कोकण परिमंडलांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ कोटी ८७ लाख ४२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली असून, कोकण परिमंडलांतर्गत एकूण १६ कोटी १५ लाख ६५ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे महावितरणकडून विक्रमी वसुलीकोकण परिमंडलांतर्गत १६ कोटी १५ लाख ६५ हजार रूपये वसूल

रत्नागिरी : सध्या महावितरणने वसुली मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून ७ कोटी २८ लाख २३ हजार रूपयांचीे वसुली करण्यात आली आहे. कोकण परिमंडलांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ कोटी ८७ लाख ४२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली असून, कोकण परिमंडलांतर्गत एकूण १६ कोटी १५ लाख ६५ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे.कोकण परिमंडलातील ७७ हजार १०६ घरगुती ग्राहकांकडून एकूण ७ कोटी ३४ लाख ९६ हजाराची वसुली करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३४ हजार ५२७ ग्राहकांकडून ३ कोटी २९ लाख १६ हजार, तर सिंधुदुर्गच्या ४२ हजार ५७९ ग्राहकांकडून ४ कोटी ५ लाख ८ हजार रूपये वसूल करण्यात यश आले आहे.वाणिज्य विभागातील कोकण परिमंडलांतर्गत ९ हजार १८४ ग्राहकांकडून ३ कोटी १४ लाख ५० हजार रूपये वसूल करण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ४ हजार ४१२ ग्राहकांकडून एक कोटी ३५ लाख ५४ हजार रूपयांची वसुली केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ हजार ७७२ ग्राहकांनी १ कोटी ३५ लाख ५४ हजार रूपये भरले आहेत. औद्योगिकच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार ४ ग्राहकांनी ४५ लाख ९ हजार, तर सिंधुदुर्गच्या ९६४ ग्राहकांनी ७२ लाख ६ हजार मिळून एकूण १ हजार ९६८ ग्राहकांनी १ कोटी १७ लाख ६९ रूपये भरले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील कृषीच्या २ हजार ६३६ ग्राहकांनी १८ लाख ८४ हजार, तर सिंधुदुर्गच्या ३०२५ ग्राहकांनी २८ लाख ५२ हजार मिळून एकूण ५ हजार ६५१ ग्राहकांनी ४७ लाख ३६ हजार रूपये भरले आहेत. आरसीआयच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ३९ हजार ९४३ ग्राहकांनी ५ कोटी ९ लाख ७९ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८ हजार ३१५ ग्राहकांकडून ६ कोटी ५७ लाख ३६ हजार मिळून एकूण ८८ हजार २५८ ग्राहकांनी ११ कोटी ६७ लाख १५ हजार रूपये भरले आहेत. सार्वजनिक पथदीपांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ४७६ स्थानिक स्वराज्य संस्थांनी १ कोटी १८ लाख १२ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५१७ संस्थांनी १ कोटी २९ लाख ६७ हजार मिळून एकूण ९९३ स्थानिक स्वराज्य संस्थांनी महावितरणकडे २ कोटी ४७ लाख ७९ हजार रूपये भरले आहेत.सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६३० ग्राहकांकडून ३५ लाख २२ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६७५ ग्राहकांकडून ५५ लाख ६ हजार मिळून एकूण एक हजार ३०५ ग्राहकांकडून ९० लाख ८२ हजारांची वसुली करण्यात आली आहे. सार्वजनिक व्यवस्थेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ८३९ ग्राहकांकडून ३४ लाख ३४ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७६८ ग्राहकांकडून १३ लाख ८ हजार मिळून एकूण एक हजार ६०७ ग्राहकांकडून ४८ लाख १४ हजारांची वसुली करण्यात आली आहे. इतर ग्राहकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १७० ग्राहकांकडून ११ लाख ९२ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८८ ग्राहकांकडून ११ लाख ९२ हजार मिळून एकूण २५८ ग्राहकांकडून १४ लाख ३८ हजार वसूल करण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी