चिपळूण : तालुक्यातील खांदाट -भोईवाडी येथे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता स्कॉर्पिओ गाडी (एमएच ११ वाय २७०६) मागे घेत असताना स्कॉर्पिओच्या मागे असलेली सुमैय्या राजू मुल्ला ही तीन वर्षाची बालिका मागच्या चाकाखाली येऊन ठार झाली.राजू अण्णासाहेब मुल्ला (२८, रा. खांदाट - भोईवाडी, मूळ सिंदगी, कर्नाटक) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात खबर दिल्यानुसार मुल्ला कुटुंब हे सुरेश शिंदे यांच्या घरी भाड्याने राहते.शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्याने स्कॉर्पिओ चालक शंकर बबन घाडगे (रा. खांदाट - भोईवाडी) हा स्कॉर्पिओ मागे घेत असताना, शिवाजी पवार यांच्या घरासमोर खेळत असलेल्या सुमैय्या राजू मुल्ला (३, रा. खांदाट भोईवाडी) हिला या स्कॉर्पिओची ठोकर बसली व ती गाडीच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाली.या अपघाताचे वृत्त समजताच, खेर्डी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोपट गवाणे, सचिन सानप व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रितसर पंचनामा केला. हा अपघात चालकाच्या चुकीमुळे झाला असून, चालक घाडगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी : स्कॉर्पिओ गाडीखाली सापडून बालिका ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 3:20 PM
चिपळूण तालुक्यातील खांदाट -भोईवाडी येथे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता स्कॉर्पिओ गाडी (एमएच ११ वाय २७०६) मागे घेत असताना स्कॉर्पिओच्या मागे असलेली सुमैय्या राजू मुल्ला ही तीन वर्षाची बालिका मागच्या चाकाखाली येऊन ठार झाली.
ठळक मुद्देस्कॉर्पिओ गाडीखाली सापडून बालिका ठारगाडी मागे घेत असताना अपघात