शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

रत्नागिरी : शिवसेना आमदार उदय सामंत यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 4:00 PM

संगणक परिचालकांचे रखडलेल्या मानधनासाठी शिवसेना आमदार उदय सामंत यांच्यासह शिवसेना पदाधिका-यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देकॉमन सर्व्हिस कंपनीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोपसंगणक परिचालकांच्या मानधनासाठी शिवसेनेचे आंदोलनआमदार सामंतांचं सुमारे 4 तास ठिय्या आंदोलन

रत्नागिरी - संगणक परिचालकांचे रखडलेल्या मानधनासाठी शिवसेना आमदार उदय सामंत यांच्यासह शिवसेना पदाधिका-यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिद तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरचे अधिकारी यांनाही यावेळी चांगलेच फटकारण्यात आले. आजच्या आज संगणक परिचालकांचे मानधन आणि ग्रामपंचायतींचे २४ लाख रुपये परत करा,  अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा आमदार सामंत यांनी यावेळी दिला. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी सूचनाही त्यांनी जिल्हा परिषदेला दिली.

जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्रे  सुरू असून, त्यामध्ये ५३७ संगणक परिचालक कार्यरत आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींमध्ये ६७ संगणक परिचालक आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये काम करीत आहेत. आपले सरकारसाठी ग्रामपंचायती दरमहा १२ हजार रुपये कॉमन सर्व्हिस सेंटर या शासननियुक्त कंपनीला देतात. त्यातून संगणक परिचालकांना ६ हजार रुपये आणि या केंद्रासाठी लागणाऱ्या  स्टेशनरीसाठी २७०० रुपये देण्याचे शासनाने या कपंनीला ठरवून दिले आहेत. मात्र, कंपनीने शासनाने दिलेले नियम, अटी सर्व धाब्यावर बसविले जात आहेत. त्याच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून अंकुश राहिलेला नाही.

संगणक परिचालकांना गेले सहा महिने ते वर्षभर मानधन दिलेले नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायतींकडून स्टेशनरीसाठी पैसे घेऊनही ती दिली गेलेली नाही. संगणक परिचालकांनी मानधनासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र कंपनीकडून धुळफेक केली जात आहे. या कंपनीकडून ग्रामपंचायतींनाही वेठीस धरले जात असल्याचे लक्षात आल्याने आमदार सामंत यांनी यामध्ये लक्ष घातले. 

जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यापूर्वी आमदार सामंत यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून समज दिली होती़ तरीही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत पैसे जमा केलेले नाही़ त्यामुळे आमदार सामंत यांच्या नेतृत्वाखाली संगणक परिचालकांनी आज शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे  बांधकाम व आरोग्य सभापती  आण्णा कदम, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, बाबू म्हाप, रोहन बने, सदस्या रचना महाडीक, रजनी चिंगळे, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, पंचायत समिती सदस्य व शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेमध्ये आमदार सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह ठिय्या आंदोलन करीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, कंपनीचे अधिकारी समशेर खान यांना तात्काळ बोलावून घेतले. आमदार सामंत यांनी आपले सरकारमध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी सूचना त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली़ त्याचवेळी स्टेशनरीच्या नावाखाली ग्रामपंचायतींची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत आतापर्यंत किती स्टेशनरी दिलीत, असा जाब कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदार सामंत यांनी विचारला. त्याच वेळी उपस्थित असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केवळ एकदाच रिकामा टोनर देण्यात आला. उलट स्टेशनरीचा खर्चही ग्रामपंचायतींना करावा लागतो, असे स्पष्ट केले़ त्यावेळी संतप्त आमदार सामंत आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींकडून जमा केलेले २५ लाख रुपये आजच्या आज ग्रामपंचायतींकडे जमा करा, अशी सूचना केली़

आमदार सामंतांनी सुमारे ४ तास ठिय्या आंदोलन करीत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सीद यांच्यावर कंपनीचे एजंट असल्याचाही आरोप केला. यावेळी शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी संतप्त झाले होते. अखेर कंपनीच्या अधिका-यांने सायंकाळपर्यंत ग्रामपंचायतींचे पैसे परत करतो, असे स्पष्ट मान्य केले.

लोकप्रतिनिधींवर कारवाई करा?

संगणक परिचालकांवर होणाऱ्या  अन्यायाविरोधात आंदोलन करणाऱ्या  लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, अशा प्रकारचे पत्र जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पोलिसांना दिले होते. त्यावर संतप्त होऊन आमदार सामंत यांनी सीद यांना चांगलेच फैलावर घेतले होते़ त्यावेळी वातावरण संतप्त झाले होते.

कंपनीला अडवणाऱ्या ग्रामसेवकावरच कारवाई

संगणक परिचालकांचे मानधन दिले जात नसल्याने तसेच ग्रामपंचायतींना स्टेशनरी दिलेली नसल्याने सरपंचांनी कंपनीचा देण्यात येणारे १२ हजार रुपये थांबविले होते. त्यावर सरपंचाना अपात्र करणेची कारवाई करणेत येईल तसेच ग्रामसेवकांवरही कारवाई करण्याची रत्नागिरी गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र पाठविले होते़ त्यावर आमदार सामंतांनी चुकीच्या पध्दतीने नोटीस देणा-यावर कारवाई करावी, अशी सूचना दिली़ त्यानंतर हे पत्र अवधानाने दिले असून चुकीचे असल्याचे अधिका-यांनी मान्य केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना