शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात  प्रशासनाकडे ४ हजार ५१९ शस्त्रे जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 10:34 AM

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १६५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ४८,३९१ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली असून

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक  - ४८ हजार ३९१ लिटर्स दारू जप्त

 

 

 

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १६५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ४८,३९१ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत ४३,५७,९७१ रूपये एवढी आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत ४५१९ शस्त्रे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देण्याकरिता जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.

 

येत्या दोन दिवसांत अंतिम पुरवणी यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. रत्नागिरी - सिंधुदुर्ग या मतदार संघासाठी एकूण १९४२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यासाठी ८५४४ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यात प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि अन्य तीन अशा चार अधिकाºयांचा समावेश असेल.

 

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ७ एप्रिल पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ११० ठिकाणी छापे टाकण्यात आले असून २७ लाख ४ हजार ७८४ रूपयांची ४०,१५४ लिटर्स दारू जप्त करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गमध्ये ५५ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून १४ लाख ३२ हजार ७४२ रूपयांची ७,१३४ लिटर्स दारू जप्त करण्यात आली आहे.  रत्नागिरीत २५६४ शस्त्रे तर सिंधुदुर्गात १९५५ शस्त्रे अशी एकूण ४५१९ शस्त्रे खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवडणुकीच्या काळात सर्वच बाबींवर बारीक लक्ष राहणार असल्याचे सांगण्यात आले.

९ तक्रारी दाखल

आत्तापर्यंत सी व्हीजिल वरून एकूण ९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारींची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टपाली मतदान ४,८८७ अर्ज प्राप्त

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील सैनिक मतदारांची संख्या १०५२ इतकी आहे. एकूण टपाली मतदान १६,१३२ इतके असून त्यापैकी आत्तापर्यंत ४,८८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. १६ एप्रिलपर्यंत टपाली मतदानाचे अर्ज घेणार आहेत.

जाहिरात प्रमाणित करणे बंधनकारक

प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर शेवटच्या ४८ तासात कोणतीही जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाची असल्यास प्रसारमाध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेणे बधंनकारक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक