मनोज मुळ्येरत्नागिरी : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा निवडणुकीत विजय झाला असला तरी रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना आघाडी घेता आली नाही. रत्नागिरीच्या किल्ल्या अजूनही उद्धव सेनेकडेच असल्याचे या निकालातून दिसले. अर्थात गतवेळी या मतदारसंघात ५९,५५९ मताधिक्य मिळवलेल्या विनायक राऊत यांना यावेळी फक्त १०,७३७ एवढेच मताधिक्य मिळाले.शिवसेनेतील फुटीनंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत उद्धवसेनेसोबत राहिले नाहीत. येथील मतदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. येथील जनतेने राऊत यांना गतवेळेइतके मताधिक्य दिले नसले तरी अजूनही उद्धवसेनाच येथे वरचढ असल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. आमदार शिंदेसेनेच असतानाही राणे पिछाडीवर कसे हा प्रश्न मात्र कायम आहे.विजयाची कारणे
- विनायक राऊत
- निवडणुकीत पराभव झाला असला तरी विनायक राऊत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मात्र आघाडी घेतली आहे.
- कोकण हा वर्षानुवर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हे कोकणी माणसासाठी जवळचे समीकरण आहे.
- राणे यांच्या तुलनेत रत्नागिरी मतदारसंघात राऊत यांच्याकडे तळागाळातील कार्यकर्ते अधिक आहेत. त्याचा फायदा राऊत यांना झाला.
- महायुतीचा उमेदवार ठरेपर्यंत राऊत यांनी दोनवेळा आपला दौरा पूर्ण केला होता.
पराभवाची कारणेनारायण राणे
- नारायण राणे यांना निवडणुकीत विजय मिळाला असला तरी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मात्र ते मागे पडले. हा त्यांच्यासाठी धक्काच आहे.
- रत्नागिरी जिल्ह्यात भाजपपेक्षा शिवसेना अधिक सक्षम आहे. फूट पडली असली तरी रत्नागिरी विधानसभा क्षेत्रात अजून उद्धवसेना अजून सक्षम आहे.
- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा हमखास मतदारसंघ असला तरी सद्यस्थितीत भाजपला सक्षम होण्याची गरज आहे.
- काही आप्तांना महायुतीतील मित्रांनी काम केले नसल्याचा संशय राणे यांनी व्यक्त केला आहे.