- विनोद पवारराजापूर - दोन दिवसांपुर्वी मुंबइ गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यानी शासनावर आसुड ओढताना चांद्रयान तीन चंद्रावर पाठवण्या एवजी महाराष्ट्रात पाठवायला हवे होते , चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबइ गोवा महामार्गावरील खड्डे पहा असा टोला लगावलेला असतानाच गुरुवारी सायंकाळी राजापूर - हातिवले येतील टोल नाका काही अज्ञातानी फोडल्याची घटना घडली आहे.
गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच सध्या मुंबइ गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झालेली आहे . येणार्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात येण्याची लगबग सुरु असतानाही अद्यापही शासन व प्रशासन महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या कोकणवासियानी आपला राग राजापूर - हातिवले येथील टोल नाक्यावर काढला आहे.
गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातानी घोषणा देत अचानक हातीवले येथील टोलनाक्याकडे आपला मोर्चा वळवत या टोलनाक्यावरील केबीनची मोठ्याप्रमाणावर मोडतोड केली असुन केबीनच्या काचाही फोडल्या आहेत . मुंबइ गोवा माहामार्गाचे काम करणार्या ठेकेदाराची मनमानी व गेली १७ वर्ष सुरु असणारे काम त्यातच यावर्षी महामार्गाची झालेली चाळण यामुळे कोकणवासियान्मधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसानी सायंकाळी उशीरा दोघाना चौकशीसाठी ताब्यात घेतले असुन चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येइल असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
मुंबई गोवा मार्गाचे काम रखडलेले असून तसेच रस्त्याची एकूण झालेले चाळण ठिकठिकाणी पडलेले खड्डे त्यात पीडब्ल्यूडी तसेच कॉन्ट्रॅक्टर यांचा मनमानी कारभार यामुळे याआधी सर्वसामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता आणि अखेर दोघा अज्ञातानी यांनी आज सायंकाळी चार वाजून 45 मिनिटांनी राजापूर हातिवले येथील टोल नाका फोडला