शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

टीईटी घोटाळ्यातील ‘त्या’ नऊ शिक्षकांना नियुक्ती नाही, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 12:43 PM

रत्नागिरी : टीईटी घोटाळ्यातील नऊ शिक्षकांना नियुक्ती देण्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. पुणे पाेलिसांच्या अहवालात या नऊ ...

रत्नागिरी : टीईटी घोटाळ्यातील नऊ शिक्षकांना नियुक्ती देण्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. पुणे पाेलिसांच्या अहवालात या नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना जिल्हा परिषदेचे दार कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिक्षक भरतीतील १ हजार १६ उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. या भरती प्रक्रियेत २६ उमेदवार गैरहजर राहिले होते. या भरती प्रक्रियेच्या वेळी टीईटी घोटाळ्यातील ९ शिक्षक उमेदवार सहभागी झाल्याचे प्रशासनासमोर आले होते. हे सर्व उमेदवार परजिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले होते.टीईटीप्रकरणी गैरमार्ग अवलंबविणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे नोंदविण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले होते. टीईटी घोटाळ्यातील सुमारे ४०० शिक्षक उमेदवार न्यायालयाच्या आदेशान्वये स्व-प्रमाणपत्र भरून शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट झाले हाेते. प्रत्यक्षात त्यातील ११६ उमेदवारांचा शिक्षक म्हणून निवड यादीत समावेश झाला होता. या उमेदवारांनी बनावट टीईटी प्रमाणपत्र वापरलेले नाही, तर केवळ बीएडच्या आधारे नववी ते बारावीसाठी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविली होती.या भरती प्रक्रियेमध्ये रत्नागिरीतही टीईटी घोटाळ्यातील उमेदवार असल्याचे समोर आले हाेते. त्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली हाेती. त्या नऊही उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यावे की नाही, याबाबत शिक्षण विभागाने अहवाल मागविला होता. पुणे पाेलिसांचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये नऊही जणांवर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट कळविण्यात आले आहे; मात्र त्यामध्ये त्यांना नियुक्ती द्यावी की नाही, याबाबत काहीही कळविलेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र न देण्याचा निर्णय घेतला आहे.पात्रता परीक्षा २०१९ मधील गैरप्रकारामध्ये ७,८७४ परीक्षार्थी व शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ मधील गैरप्रकारामध्ये १,६६३ परीक्षार्थी असे एकूण ९,५३७ परीक्षार्थी सहभागी आहेत. संबंधित गैरप्रकारातील परीक्षार्थींची परीक्षेतील संपादणूक रद्द करण्यात आली होती.तसेच त्यांना यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले होते; परंतु त्यातील परीक्षार्थी पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये न्यायालयाच्या आदेशान्वये स्व-प्रमाणपत्र भरून समाविष्ट झाले. त्यापैकी काही उमेदवारांची या भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून निवड झाली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक