शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

रेडक्रॉसमुळे दोन हजार व्यक्तींना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 4:12 PM

रत्नागिरी इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जनसेवेप्रति बांधिलकी जपत स्थापनेपासून आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या हजारो रूग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान दिले आहे. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळेच गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक रूग्णांना नवजीवन मिळाले आहे.

ठळक मुद्देजागतिक रेड क्रॉस दिन : शून्यातून उभी राहिलेली एक अद्वितीय संस्थाहजारो रुग्णांना रक्तपुरवठा, शववाहिकाही उपलब्ध

शोभना कांबळे 

रत्नागिरी : रत्नागिरी इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जनसेवेप्रति बांधिलकी जपत स्थापनेपासून आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या हजारो रूग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान दिले आहे. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळेच गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक रूग्णांना नवजीवन मिळाले आहे.युद्धात जखमी होणारे सैनिक, आपद्ग्रस्त यांना मदत करण्याच्या गरजेतून रेडक्रॉस संस्थेची स्थापना करण्यात आली. रत्नागिरीत डॉ. श्रीधर सामंत यांच्या हॉस्पिटलच्या एका छोट्याशा जागेत १९८१ साली रेड क्रॉस सोसायटीचे कामकाज सुरू झाले.

सुरूवातीला आश्रमशाळा, तसेच इतर शाळांतील गरजू मुलांना टुथपेस्ट, पावडर, बिस्कीटे यांचे वाटप करण्यास सोसायटीने प्रारंभ केला. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी जिल्ह्यात एकमेव शासकीय रूग्णवाहिका तसेच शववाहिका होती. त्यामुळे सामान्य रूग्णांची गरज लक्षात घेऊन सोसायटीने वाहन विकत घेऊन जिल्ह्यात रूग्णवाहिका तसेच शववाहिका उपलब्ध करून दिली. सोसायटीने ना नफा ना तोटा या तत्वाने ही सेवा १२ वर्षे रूग्णांसाठी अत्यल्प उपलब्ध करून दिली होती.अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. आजारांचेही स्वरूप बदलले. अशावेळी अपघातात जखमी होऊन किंवा विविध जीवघेण्या आजाराने बेजार झालेल्या, भाजलेल्या रूग्णांसाठी वेळेवर रक्त मिळणे गरजेचे असते. त्याकाळी रत्नागिरीत रक्तपेढी नसल्याने रूग्णाला अत्यवस्थ स्थितीत पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर येथे हलवावे लागे किंवा तातडीने रक्त मागवावे लागे.

यासाठी येणाऱ्या तांत्रिक, आर्थिक अडचणीमुळे बरेचदा रूग्ण दगावण्याच्या घटना घडत असत. ही गैरसोय लक्षात घेऊन रेडक्रॉस सोसायटीने २४ फेब्रुवारी १९८३मध्ये रेडक्रॉस ब्लड बँकेची सुरूवात केली. या ब्लड बँकेमुळे आतापर्यंत हजारो रूग्णांना जीवनदान मिळवून त्यांच्या कुटुंबात आनंदाची पहाट निर्माण केली आहे.सामाजिक कार्यात आतापर्यंत कार्य करत आलेल्या रेडक्रॉस सोसायटीच्या या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या संस्थेच्या कार्याचा गौरव करून राष्ट्रीय पातळीवर तीन वेळा मेरिट सर्टिफिकेट आणि राजा महाराजा ट्रॉफीने या सोसायटीचा गौरव करण्यात आला आहे. 

समाजामध्ये रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणावर प्रबोधन झाले आहे. त्यामुळे स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढली आहे. सामाजिक बांधिलकीतून रक्तदानासारखी शिबीरे आयोजित करण्याकडे विविध संस्थांचा, संघटनांचा कल वाढला आहे. या रक्तदात्यांचा इंडियन रेडक्रॉस सोसायटीला मोठा हातभार मिळत आहे. कुठल्याही क्षणी बोलावताच हे दाते रक्तपेढीत येवून रक्तदानासाठी सहकार्य करतात. रक्तपेढीच्या कार्यात या रक्तदात्यांचे योगदान महत्वाचे आहे.- डॉ. श्रीधर सामंत, मानद सचिव,इंडियन रेडक्रॉस सोसायटी, रत्नागिरी.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीRatnagiriरत्नागिरी