रत्नागिरी : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन व जिल्हा पणन कार्यालय यांच्यातर्फे जिल्ह्यात नवीन हंगामातील भात खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना भात खरेदी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १४ धान्य खरेदी केंद्रांवर धान्याची खरेदी करण्यात येते. धान्य खरेदीसाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत खरेदीसाठी आवाहन करण्यात आले आहे. खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी मर्यादित, गुहागर तालुका खरेदी-विक्री संघ, चिपळूण तालुका खरेदी-विक्री संघ, शिरळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी, शिरगाव विविध सहकारी सोसायटी, रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ, लांजा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, राजापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ येथे भात खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
सर्व शेतकऱ्यांनी भात पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबुक, आदी कागदपत्र घेऊन संबंधित केंद्रावर नोंद करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.