मेहरून नाकाडेरत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. ओला व सुका वर्गीकरण करूनच कचरा संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता राखली जात असून, केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सलग तीन वर्षे नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.शहरातील १५ प्रभागांतून कचरा संकलन करण्यात येते. दररोज २२ टन कचरा संकलन होत असतो. नागरिकांना कचरा संकलनासाठी दोन वेगवेगळ्या डस्टबीन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनादेखील ओला व सुका कचरा वर्गीकरणाची सवय लागली आहे. शहरातील कचराकुंड्याही उचलण्यात आल्या असून, नगर परिषदेचे कर्मचारी वेळेवर कचरा उचलत आहेत, शिवाय रस्त्यांवरील साफसफाईही नियमित केली जात असल्याने स्वच्छता राखली जात आहे.ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरणशहरातील १५ प्रभागांतून सकाळी सात ते दुपारी ३ वाजेपर्यंत २० घंटागाड्यांच्या माध्यमातून २२ टन कचऱ्याचे संकलन करण्यात येते. कचरा संकलन करतानाच ओला व सुका अशा दोन प्रकारांतच नागरिकांकडून घेण्यात येत असल्याने कचऱ्याचे वर्गीकरण करणे सोपे होते. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येते, तर सुका कचरा वेगळा करून त्यातील प्लास्टिक बाजूला करून ते पुनर्वापरासाठी कंपनीकडे पाठविण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून तयार होणारे खत शेतकरी बागायतींसाठी विकत घेतात.जीपीएस यंत्रणाकचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असल्याने घंटागाड्या नियमित कचरा संकलन करतात की नाही, यावर लक्ष ठेवणे सोपे होते. एखाद्या प्रभागात घंटागाडी कचरा संकलनासाठी गेली अथवा नाही, हे जीपीएस प्रणालीद्वारे लगेच निदर्शनाला येते. त्यामुळे नागरिकांची तक्रार आल्यास निवारण करणे सोपे होते.शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीनपर्यंत कचरा संकलन पूर्ण केले जाते. जीपीएस प्रणालीमुळे कचरा संकलन वेळेवर व नियमित होत आहे की नाही, याची माहिती मिळणे सोपे होत आहे. सुयोग्य व्यवस्थापनामुळेच सलग तीनवेळा स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.- अविनाश भोईर, अभियंता, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता
योग्य नियोजनामुळे रत्नागिरीतील कचरा संकलन नियमित, स्वच्छ भारत सर्वेक्षणात हॅट्ट्रीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 12:05 PM
Garbage Disposal Issue Ratnagiri-रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. ओला व सुका वर्गीकरण करूनच कचरा संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता राखली जात असून, केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सलग तीन वर्षे नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ठळक मुद्देयोग्य नियोजनामुळे रत्नागिरीतील कचरा संकलन नियमित, स्वच्छ भारत सर्वेक्षणात हॅट्ट्रीकओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, शहरातील १५ प्रभागांमधून कचरा संकलन