रत्नागिरी : सामाजिक कार्य करताना विशिष्ट आणि ठरावीक मर्यादा न ठेवता संस्था कार्यरत असतात. जात, पात, धर्म न पाहता निव्वळ सामाजिक दायित्वातून करीत असलेले काम नक्कीच उल्लेखनीय आहे. भविष्यात असेच काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास रिलीफ फाउंडेशन खेडचे संस्थापक अध्यक्ष व माजी सभापती सिकंदर जसनाईक यांनी केले.
खेड येथील रिलीफ फाउंडेशनतर्फे चिपळूण येथील महापुरात मदत केलेल्या संस्थांचा सन्मान हॉटेल रिम्ज येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी खेडचे संस्थापक अध्यक्ष व माजी सभापती सिकंदर जसनाईक बोलत होते.
या वेळी सिकंदर जसनाईक यांनी संपर्क युनिक फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करून संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेला सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे यांनी पुरस्कार स्वीकारला.
संपर्क युनिक फाउंडेशनाला मिळालेला हा सन्मान आमच्या सर्व सभासदांचा असून यापुढे आम्ही असेच काम करत राहू, असे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी सांगितले.