रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाने अहवाल दिला असून, त्यांनी काही अडचणी मांडल्या आहेत. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. त्यासाठी अशा वाड्यांचे जतन करणाऱ्या आर्किटेक्टच्या मदतीने वाड्याचे जतन व्हावे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रत्नागिरीत व्यक्त केले.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. दोन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये त्या विविध मंदिरांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी आज, सोमवारी रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मभूमीला भेट देऊन केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, लोकमान्य टिळक यांचे हे जन्मस्थान, कर्मभूमी पुण्यात आहे. त्यांचा वाडा, पुण्यात वास्तव्य असलेला वाडा आणि त्यांचे चरित्र हे फक्त मराठीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील व्यक्तिला माहिती आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश, देव आणि धर्मासाठी समर्पित केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या संदर्भात पुनर्वसनाचे आणि मदतीचे कार्य केले. त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्यातील सामाजिक घटकांना अधिक मदत व्हावी, यासाठीच हा दौरा असल्याचे त्या म्हणाल्या. या दौऱ्याची सुरुवातच लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानापासून केली आहे. त्याचबरोबर पतितपावन मंदिर आणि अन्य ठिकाणांना भेटी देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली...तर चांगला फरक पडतोत्या पुढे म्हणाल्या की, दुर्दैव्याने पुरातत्व विभागाच्या अडचणी सगळीकडे दिसत आहेत. परंतु, त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला तर त्यांच्या एकूणच कारभारात चांगला फरक पडतो, असे निदर्शनाला आले आहे. पुरातत्व विभागाने पाणी गळत आहे, दुरुस्तीत काही अडचणी आहेत, याबाबतचा अहवाल दिला आहे. पुरातत्व विभागाचे म्हणणे असते की, मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. ते होण्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची गरज असते. रत्नागिरीमध्ये आर्किटेक्टरची कमी नाही, अशा वाड्यांचे जतन करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मदतीने वाड्याचे चांगले जतन व्हावे, असा माझा प्रयत्न राहिल, असे उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले. याचा सर्व अहवाल पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल असेही त्या म्हणाल्या.
लोकमान्य टिळकांच्या वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाने दिला अहवाल, नीलम गोऱ्हे म्हणाल्या..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 11:49 AM