शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सायबाच्या धरणाचा अहवाल शासनाला सादर

By admin | Published: September 11, 2016 11:12 PM

राजापूरची पाणीटंचाई मिटणार : दहा कोटींचा खर्च अपेक्षित

 राजापूर : गेली १३८ वर्षे राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सायबाच्या धरणाची पाहणी करून तयार केलेला संयुक्त अहवाल राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, त्यानुसार सध्याच्या धरणाच्या जागी पंधरा हेक्टर जमीन क्षेत्रात दीडशे मीटर लांब व पंधरा मीटर उंच मातीचे धरण आवश्यक असल्याची नोंद करण्यात आली आहे, त्यासाठी दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेली अनेक वर्षे राजापूर शहराला ब्रिटिशकालीन धरणातून नैसर्गिक दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सायबाचे धरण अशीही त्याची ओळख आहे. धरणाला गळती लागल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दरवर्षी साधारणपणे दहा महिने शहराला पाणीपुरवठा करताना अडचणी येत नाहीत. सन २०११च्या जनगणनेनुसार राजापूर शहराची लोकसंख्या नऊ हजार सातशे त्रेपन्न एवढी आहे. पुढील पंधरा वर्षांचे नियोजन करता या शहराची लोकसंख्या पंधरा हजारच्या घरात जाऊन पोहोचण्याची शक्यता गृहीत धरता १३५ लीटर प्रतिव्यक्ती व प्रकल्पातील लिकेजीस आणि लॉसेस लक्षात घेता २.४० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता लागेल. पावसाळावगळता दोनशे सत्तर दिवसांसाठी सहाशे छप्पन दशलक्ष लीटर एवढी पाण्याची गरज लागेल, याचा अंदाज घेऊनच धरणाबाबतचा तसा अहवाल सादर करण्यात आला आहे. शासनाच्या लघुपाटबंधारे व जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने संयुक्त अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. नवीन धरणासाठी दहा कोटींचा निधी आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात राजापूर शहराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)