शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

Ratnagiri: भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, तळवडे वाकाडवाडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 1:08 PM

बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले

राजापूर/पाचल : भक्ष्याचा पाठलाग करत विहिरीत पडलेल्या बिबट्याला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप विहिरीबाहेर काढून वनविभागाने जीवदान दिले. राजापूर तालुक्यातील तळवडेपैकी वाकाडवाडी येथे गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. सुमारे सहा महिन्यांचा हा बिबट्या मादी जातीचा आहे, अशी माहिती रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी दिली आहे.तळवडेपैकी वाकाडवाडी येथील ग्रामस्थ सीताराम तुकाराम चव्हाण यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती तलाठी अजित पाटील यांनी राजापूर वनपाल सदानंद घाडगे यांना दिली. घाडगे यांनी रत्नागिरी वनक्षेत्रपाल यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने पाहणी केली असता भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले.

या विहिरीला कठडा नाही तसेच विहीर जवळपास तीस फूट खोल असून घेरा पंधरा फूट आहे. विहिरीचा काठ ठिसूळ असून सतत माती व दगड पडत होते. विहिरीमध्ये बिबट्या व मांजर दिसले. मात्र, हे मांजर मृत होते. विहिरीत पिंजरा साेडून दुपारी १२:२५ वाजता बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात यश आले.लांजा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडून या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे व चिपळूण सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूर वनपाल सदानंद घाडगे, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार, रत्नागिरीचे प्रभू साबने, राजापूरचे दीपक म्हादे यांनी सहभाग घेतला हाेता. तसेच विजय म्हादे, गणेश गुरव, प्रथमेश म्हादे, नीलेश म्हादे, तळवडे सरपंच गायत्री साळवी, पोलिस पाटील शीतल कोटकर, तंटामुक्त अध्यक्ष शिवराम कोटकर, महिला दक्षता कमिटी पोलिस स्थानकाच्या धनश्री मोरे, रायपाटण दूरक्षेत्राचे पोलिस हेडकाॅन्स्टेबल कमलाकर पाटील, सुजित पाटील, नितीन भानवसे, तसेच पत्रकार तुषार पाचलकर, सुरेश गुडेकर, दया सुतार व अन्य ग्रामस्थांनी सहकार्य केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग