शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

Ratnagiri: गुहागरात गणेश विसर्जनावेळी बुडणाऱ्या पाचजणांना वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:45 PM

गुहागर : येथील समुद्रकिनारी विसर्जनासाठी समुद्रात गेलेले पाच तरुण बुडत असताना गुहागर नगरपंचायतीच्या सुरक्षारक्षकांनी वाचवले. समुद्रात दोरखंड टाकून या ...

गुहागर : येथील समुद्रकिनारी विसर्जनासाठी समुद्रात गेलेले पाच तरुण बुडत असताना गुहागर नगरपंचायतीच्या सुरक्षारक्षकांनी वाचवले. समुद्रात दोरखंड टाकून या सुरक्षारक्षकांनी या पाचजणांना वाचवले. ही घटना गुरुवारी सायंकाळी गौरी-गणपती विसर्जनाप्रसंगी घडली. गुहागर नगरपंचायतीचे आशिष सांगळे व जगन्नाथ घोरपडे या दोन सुरक्षारक्षकांमळे माेठा अनर्थ टळला.गुरुवारी १२ सप्टेंबरला सायंकाळी दुर्गादेवी वाडीतील गौरी-गणपतीची मिरवणूक दुर्गादेवी मंदिरासमोरील पाखाडीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आली. भक्तिभावाने गौरी-गणपतीची समुद्रावर सामूहिक आरती झाली. त्यानंतर एकेकजण गणपतीची मूर्ती घेऊन समुद्रात विसर्जनासाठी जाऊ लागले. गणेश मूर्तींचे विसर्जन करुन समुद्रातून परतत असतानाच पाच तरुण एका लाटेने खोल समुद्रात ओढले गेले. किनाऱ्यावरुन समुद्राचे निरीक्षण करणाऱ्या आशिष सांगळे, जगन्नाथ घोरपडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीने आपल्याकडील दोरखंडाला बोया बांधून तो खोल समुद्रात भिरकावला. समुद्रात अडकलेल्या तरुणांसाठी ती आयुष्याची दोरी ठरली.प्रथम दोरखंडाला बांधलेला बोया दोघांच्या हाती लागला. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेण्यासाठी या दोन तरुणांची धडपड सुरु होती. त्याचवेळी आणखी एक लाट आली आणि उर्वरित तीन सहकारीही बोयाच्या जवळ आले. पण तोपर्यंत बोयाला बांधलेला दोरखंड समुद्रात जाऊ लागला. किनाऱ्यावरुन दोरखंड ओढणारे चार पाच सहकारी जवळपास छातीभर पाण्यात लाटा झेलत उभे होते.जीवनमरणाच्या हिंदोळ्यावरचा हा काही क्षणांचा खेळ किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्वांचेच प्राण कंठाशी आणत होता. तितक्यातच आणखी १० - १२ जणांनी धावत जाऊन खोल समुद्रात जाणारा दोरखंड पकडला. त्यानंतर सर्वजण किनाऱ्यावर सुखरुप परतले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आशिष सांगळे व जगन्नाथ घोरपडे या दोन सुरक्षारक्षकांचा नगरपंचायतीने शुक्रवारी सत्कार केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीguhagar-acगुहागरdrowningपाण्यात बुडणे