ठळक मुद्देगणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील चौघेजण समुद्रात बुडत असल्याचा प्रकार शनिवारी (29 डिसेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला.किनाऱ्यावरील जीवरक्षकांना चौघांचेही प्राण वाचवण्यात यश आले आहे. धानोरी पुणे येथील विकास वाघमारे आणि सिद्धासम भगळे तसेच सिडको औरंगाबाद येथील पवन वहाबकर आणि मयुर गिरे हे शनिवारी पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले.
गणपतीपुळे - गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील चौघेजण समुद्रात बुडत असल्याचा प्रकार शनिवारी (29 डिसेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र किनाऱ्यावरील जीवरक्षकांना चौघांचेही प्राण वाचवण्यात यश आले आहे.
धानोरी पुणे येथील विकास वाघमारे (25) आणि सिद्धासम भगळे (34) तसेच सिडको औरंगाबाद येथील पवन वहाबकर (21)आणि मयुर गिरे (18) हे शनिवारी पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आपल्या ग्रुपसमवेत आले. पोहण्यासाठी म्हणून ते समुद्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून जीवरक्षक रोहीत चव्हाण, विशाल निंबरे, विक्रम राजवाडकर, अनिकेत मयेकर, मिलिंद माने, उमेश म्हादये आणि अनिकेत राजवाडकर यांनी त्या चौघांना वाचवले.