चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हाेता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावर्डे : शहीद दिनाला ९० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सावर्डे (ता. चिपळूण) येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३३ रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले. श्री हॉस्पिटल व लब्बैक कमिटी मुल्ला मोहल्ला, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबईतील संवेदना, मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सावर्डेच्या सरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, सदस्या समिया मोडक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबू चव्हाण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. श्री हॉस्पिटलचे डॉ. प्रफुल्ल माने यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले.
सायन
रुग्णालयातील शुभम भोई, डॉ. शगून नागरे, डॉ. अंकिता देशमुख, जयेश चिंचवळकर, अमेय जाधव, अनंत गाडे, दत्तू इगावे, श्रीकृष्ण चव्हाण, बाळू सावंत, महेंद्र मयेकर, अशोक बोडके आदींचे पथक रक्तदान शिबिरासाठी आले होते. पंचायत समितीच्या सदस्या पूजा निकम, सावर्डेचे माजी सरपंच बाळू मोहिरे, शौकत माखजनकर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सूर्यकांत चव्हाण, देवराज गरगटे, सुभाष सावंत, शिवसेनेचे प्रदीप चव्हाण, अकलाख शेख, अनिरुद्ध निकम आदींनी शिबिराला भेट दिली.
सावर्डे मुल्ला
मोहल्ला जमातीचे अध्यक्ष रफिक मुल्लाजी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व लब्बैक कमिटीचे अध्यक्ष मजिद मुल्लाजी, उपाध्यक्ष गुलजार गोलंदाज, सचिव तहसीम मुल्लाजी, असलम काद्री, गफ्फार गोलंदाज, शकील पटेल, अझर गोलंदाज, फैजान मुल्लाजी, राहील गोलंदाज, हुसैन गोलंदाज, शादाब काद्री, अरबाज मुल्लाजी, फहद शेख, इफ्राज काद्री, तौफिक काद्री, परवेज मुल्लाजी आदींनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.