साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात चार गृहभेट पथके तयार केली असून, प्रत्येक पथक नेमून दिलेल्या वाड्या-वस्त्यांचे सर्वेक्षण करीत आहे.
यामध्ये आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, शिक्षक, त्याचबरोबर स्वत: सरपंच बापू शेट्ये, उपसरपंच प्रवीण जोयशी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ अनिल लिंगायत, पत्रकार संतोष पोटफोडे यांचा समावेश आहे.
या मोहिमेत उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सरपंच बापू शेट्ये यांनी सांगितले. दर दिवशी ५० कुटुंबांना भेटी देऊन त्यांची नोंदणी, तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, कोरोनासदृश लक्षणे आदीबाबतची माहिती घेतली जात आहे.
................................
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे सरपंच बापू शेट्ये यांनी ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभाग घेतला आहे. (छाया : संतोष पोटफोडे)