शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

बक्षीसपात्र निहार म्हणतो, ‘टॅब’चा आनंदच वेगळा

By admin | Published: July 04, 2017 7:10 PM

‘लोकमत’ आयोजित ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेत सहभागी स्पर्धक भारावला

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. 0४ : ‘‘मी सहावीमध्ये शिकत आहे. आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये मी सहभागी झालो असून, खूप बक्षिसेही मिळवली आहेत. मात्र ‘लोकमत’ आयोजित ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेत गतवर्षी सहभागी झालो होतो. या स्पर्धेत मला ‘टॅब’ बक्षीस मिळाला. आतापर्यंतच्या मला मिळालेल्या विविध बक्षिसांपैकी ‘टॅब’चा आनंद काही वेगळाच आहे. मला मिळालेल्या बक्षिसाबद्दल माझी शाळा, शिक्षकवृंद, मित्र, आई-बाबा, आजी-आजोबा व नातेवाईकांनादेखील खूप खूप आनंद झाला. माझा धाकटा भाऊ तर ‘टॅब’ पाहून हरखूनच गेला’’ हे उद्गार आहेत वालोपे (ता. चिपळूण) येथील ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूलमधील सहावीचा विद्यार्थी निहार सुरेंद्र जाधव याचे. यावेळी निहार म्हणाला, ‘‘मला वाचनाची सवय माझ्या आजी-आजोबांकडून लागली आहे. आमच्या घरी दररोज ‘लोकमत’ येतो. सकाळी आजोबा व बाबा न चुकता वर्तमानपत्र वाचतात. दुपारच्या वेळेत घरातील कामे आटोपल्यानंतर आजी व आईदेखील पेपर वाचते. इतकेच नव्हे तर पेपरमधील बातम्या, विशेष वृत्ताबाबत घरामध्ये चर्चादेखील केली जाते. त्यामुळेच मलादेखील पेपर वाचण्याची सवय लागली. ‘लोकमत’तर्फे दरवर्षी ‘संस्काराचे मोती’ ही शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येते. मी देखील या स्पर्धेत सातत्याने सहभाग घेत आहे. या स्पर्धेनिमित्त प्रसिध्द होणारे कुपन कापून ते प्रवेशिकेवर चिकटवत होतो. ८५ कूपन चिकटवल्यानंतर प्रवेशिका शाळेत जमा केली. होळीच्या सुटीत या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. बाबांच्या मोबाईलवर फोन करून मला बक्षीस मिळाल्याचे ‘लोकमत’कडून कळवण्यात आले. यावेळी मला खूप आनंद झाला. केव्हा एकदा बक्षीस मिळते, असे झाले. शाळेत माझे बक्षीस पाठवण्यात आले. सिस्टर लिमेट यांच्याहस्ते ‘टॅब’ माझ्या हातात आला. त्यांनीही माझे अभिनंदन केले. मी शाळेतील सर्व मित्रांना माझा नवीन ‘टॅब’ दाखवला, त्यांनाही आनंद झाला. घरची सर्वच मंडळी एकदम खूश होती. या टॅबद्वारे मी गेम खेळतो, व्हॉट्सअ‍ॅप, व्हिडिओ कॉल असो वा यू ट्यूबवरून गाणी डाऊनलोड करणे असो मी हे सर्व अगदी सहजतेने करतो. मला धाकटा भाऊ आहे. त्यालाही माझ्या ‘टॅब’बद्दल विलक्षण कौतुक आहे. मी माझ्या टॅबला कमालीचा जपतो. मात्र हा टॅब मी शाळेच्या वेळेत कधीच वापरत नाही, असे तो म्हणतो. दररोज शाळेतील अभ्यास, गृहपाठ वेळीच पूर्ण केल्यानंतरच टॅबवर गेम खेळतो. ‘लोकमत’च्या स्पर्धेतून मला मिळालेल्या बक्षिसाचे महत्त्व हे अन्य सर्व बक्षिसांपेक्षा वेगळे आहे,’ असे त्याने आवर्जून सांगितले.