शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

आरजीपीपीएल् बंद झाल्याचा फटका

By admin | Published: November 12, 2014 9:39 PM

आर्थिक कोंडी : ग्रामपंचायतींचे कोट्यवधी रूपये थकले; पंचायत समिती कारवाई इशारा

असगोली : गॅसच्या तुटवड्यामुळे गेले वर्षभर वीजनिर्मिती ठप्प असल्याने आरजीपीपीएल कंपनी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडली आहे. त्यामुळे त्या विद्युत प्रकल्पाकडून अंजनवेल, वेलदूर व रानवी या ग्रामपंचायतींना वार्षिक कर अदा करण्यात अडचण निर्माण झाली आहे.या तीनही ग्रामपंचायतींना सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील कराची सुमारे १ कोटी १९ लाख ८२ हजार इतकी रक्कम अदा करण्याचे संकट सध्या कंपनी व्यवस्थापनापुढे आहे. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून कर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सुरुवातीला ५० टक्के रक्कम तरी द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कंपनीला देण्यात आला आहे.सन २००२मध्ये कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने एन्रॉन दाभोळ वीज कंपनीचे रत्नागिरी गॅस आणि विद्युत कंपनीत रुपांतर करुन सन २००५मध्ये एनटीपीसी व गेल या कंपन्यांनी वीजनिर्मिती प्रक्रियेला सुरुवात केली. सुरुवातीला कंपनी बंद पडल्यानंतर ग्रामपंचायतींना मालमत्ता कर मिळणे अशक्य वाटत होते. मात्र, ग्रामपंचायतीना सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आरजीपीपीएलने थकीत कर देण्यास सुरुवात केली. दरम्यान, आतापर्यंत कंपनी सुरळीतपणे ग्रामपंचायतींना कर देत आली आहे. परंतु वर्षभरापासून कंपनी आर्थिक कोंडीत सापडल्याने हा कर देण्यास कंपनी व्यवस्थापनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आर्थिक कोंडी झाल्यामुळे कंपनीपुढे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या.अंजनवेल, वेलदूर व रानवी या तीन ग्रामपंचायतींच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दि. १६ सप्टेंबर रोजी कंपनीत जाऊन चालू वर्षातील कर मिळावा, अशी मागणी केली होती. यावेळी २५ टक्के रक्कम देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे. मात्र, दीड महिना झाल्यानंतरही याकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याने पंचायत समितीने कंपनी व्यवस्थापनाला कराबाबत बैठक घेण्याची विनंती केली. या बैठकीला सभापती राजेश बेंडल, गटविकास अधिकारी आंब्रे आदी गेले होते. परंतु यावेळी कंपनीकडून टोलवाटोलव होत असल्याचे लक्षात आल्याने आम्ही चर्चा केल्याशिवाय येथून जाणार नाही, असा पवित्रा पंचायत समितीने घेतला. यानंतर आरजीपीपीएल प्रशासनाचे अधिकारी देशमुख, व्यवस्थापक देशपांडे, अप्पर महाव्यवस्थापक आर. एस. कौल यांच्याकडे कराबद्दलचा मुद्दा रेटून धरला. सभापतींनीदेखील आक्रमक होत कंपनीकडून दरवर्षी कर अदा होत असताना त्याची तरतूद करणे व्यवस्थापनाचे काम असते. २५ टक्के रक्कम देण्याचे कबूल करुनही आश्वासन पूर्ण केले नाहीत. पूर्ण रक्कम देता येत नसेल, तर अंजनवेल ग्रामपंचायतीचे १ कोटी २० लाख, वेलदूरचे २१ लाख २७ हजार, तर रानवीची २० लाख ९२ हजार या रकमेपैकी ५० टक्के रक्कम कंपनीने अदा करावी, अशी मागणी केली. कर न भरल्यास कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा सभापती बेंडल यांनी दिला आहे. (वार्ताहर)तीनही ग्रामपंचायतींना आर्थिक वर्षातील कराची सुमारे १ कोटी १९ लाख ८२ हजार इतकी रक्कम अदा करण्याचे संकट.अंजनवेल ग्रामपंचायतीचे १ कोटी २० लाख, वेलदूरचे २१ लाख २७ हजार, तर रानवीची २० लाख ९२ हजार, यापैकी ५० टक्के रक्कम अदा करण्याची मागणी.