रत्नागिरी : पोलीस, बँकांकडून वेळोवेळी ऑनलाइन फसवणुकीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असली, तरी या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना माहिती पुरवतो कोण, याकडेही लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे.
बीएसएनएलची धुरा ठरावीक कर्मचाऱ्यांवर
रत्नागिरी : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबिले आहे. बीएसएनएलचे रत्नागिरीतील प्रधान कार्यालय काही वर्षांपूर्वी १५० कर्मचाऱ्यांनी गजबजलेले होते. आता याच कार्यालयात आठ कर्मचाऱ्यांवर कार्यालय सांभाळण्याची वेळ आली आहे. प्रत्येक मजल्यावरील विभागात एक किंवा दोनच कर्मचारी उपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
जिल्ह्यात काँग्रेस खिळखिळी
रत्नागिरी : जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस कधी येणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पदाधिकारी केवळ जयंत्या साजऱ्या करून फोटो काढतात, तसेच वरिष्ठ नेतेमंडळी आली की एकत्रित जमतात, अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
रस्त्याचे काम बंद करण्याचे आदेश
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील वरवडे भंडारवाडा खाडीकिनाऱ्याजवळील खासगी, पत्तन विभागाच्या सार्वजनिक जागेत नियमांचा भंग करून नव्याने रस्ता तयार केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर, सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले.
मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने वेळोवेळी कोविड-१९ च्या घातलेल्या नियमांचे पालन करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. तरीही, शहर परिसरातील अनेक लोक मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यासाठी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.