पावस : शिवसेनेचे गोळप विभागप्रमुख नंदा मूरकर यांच्या प्रयत्नातून मावळंगे महाकाली मंदिर रस्त्याच्या कामासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर निधीतून रस्त्याचे खडीकरण करण्यात आले.
या रस्त्याचे खडीकरण करण्याची मागणी गेली कित्येक वर्ष करण्यात येत होती. गोळप विभागप्रमुख नंदा मूरकर यांनी आमदार उदय सामंत यांच्याकडे रस्त्याची परिस्थिती कथन केली. त्यानंतर आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकरिता १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. हा रस्ता २६० मीटरचा असून, त्याचे खडीकरण करण्यात आले. पावसाळ्यामध्ये खडीकरण करण्यात आल्यामुळे ते चांगले व मजबूत होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली. या कामासाठी नीलेश गजने यांनीही सहकार्य केले.
-------------------------
आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील रस्त्याचे खडीकरण पूर्ण करण्यात आले.