मंडणगड : जिल्ह्यात जाहीर झालेल्या कडक लाॅकडाऊनमुळे गुरुवारी मंडणगडामधील बाजारपेठ पूर्णत: बंद हाेती़ त्याचबराेबर नागरिकांनीही घरात थांबणे पसंत केल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसत हाेता़
लाॅकडाऊनची अंमलबजावणी करताना पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांनी २७ पोलीस व १९ होमगार्ड, नगर पंचायत यांच्या साथीने संपूर्ण शहरात बंदाेबस्त ठेवला हाेता़ तालुक्यात रायगड जिल्ह्याच्या बाजूला म्हाप्रळ या ठिकाणी महाड तालुक्याचे बाजूस लाटवण या ठिकाणी तसेच मंडणगड शहरात दापोली फाटा भिंगळोली गावाच्या प्रवेशद्वारावर तसेच पालवणी फाट्यावर तपासणी नाके लावण्यात आले हाेते़ अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर बारीक लक्ष ठेवण्यात आले हाेते़ स्वतः पोलीस निरीक्षक सर्वच नाक्यांवर गस्त घालत हाेते़ नगर पंचायतीच्या मदतीने शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता. या नियोजनाला तालुक्यातील जनतेसह व्यापाऱ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला़ नागरिकांनी असाच प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे तसेच वाढती रुग्णसंख्या रोखीला सहकार्य करावे, असे आवाहन सुशांत वराळे यांनी केले आहे.
----------------------
लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंडणगड शहरात पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता़ (छाया : प्रशांत सुर्वे)