असगोली : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुहागर शहरात सर्व व्यापाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून आरोग्य विभागाला सहकार्य केले.
गुहागर आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना तपासणीवर जोर देण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने सर्वच नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले आहेत. लोकांची वाढत्या गर्दीमुळे व्यापारी व दुकानातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुहागर शहर परिसरातील सर्व व्यापारी व त्यांचे सर्व कर्मचारी यांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून टेस्ट करून घेतली.
जे व्यापारी चाचणी करून घेतील, त्यांनाच दुकाने उघडता येणार असल्याचे नगर पंचायत प्रशासनाने सांगितले आहे.