शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

चिपळूण अर्बन बँकेवर सत्ताधारी पॅनेलचा झेंडा

By admin | Published: June 16, 2015 1:02 AM

सर्व जागा जिंकल्या : अध्यक्ष रेडीज पुन्हा प्रथम क्रमांकाने विजयी

चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करताना सर्वच्या सर्व जागा जिंकून एकतर्फी विजय संपादन केला आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय रेडीज सर्वसाधारण गटात पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले आहेत. सर्वपक्षीय सहकार पॅनेलने बाजी मारली; पण या पॅनेलमध्ये समाविष्ठ न झालेल्या शिवसेनेची संधी हुकली. या निवडणुकीत नवउदय पॅनेलचा धुव्वा उडाला. चिपळूण अर्बन बँकेची मतमोजणी बँकेच्या राजाभाऊ रेडीज सभागृहात सोमवारी सकाळी सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात दुपारी चिपळूण तालुक्याबाहेरील मतदार संघ (सर्वसाधारण)चा निकाल जाहीर झाला. सहकार पॅनेलचे धनंजय खातू यांना १४८२ मते मिळाली, तर अपक्ष सचिन बाईत यांना ७९५ मते मिळाली. इतर मागास प्रवर्गातून सहकारचे प्रशांत शिरगांवकर विरुद्ध नवउदय पॅनेलचे प्रवीण तांबट यांच्यात लढत झाली. शिरगावकर यांना ४७५६, तर तांबट यांना १३०९ मते मिळाली. विमुक्त जाती, भटक्या जमाती या मतदार संघात सहकारचे नीलेश भूरण विरुद्ध अपक्ष अविनाश केळसकर यांच्या लढत झाली. केळसकर यांना १४७०, तर भुरण यांना ४५१० मते मिळाली. चिपळूण तालुका सर्वसाधारण मतदार संघात सहकार पॅनेलचे संजय रेडीज ३१९७ मते, मंगेश ऊर्फ बाबू तांबे ३०२४, मोहन मिरगल २९८५, सतीश खेडेकर २९३७, निहार गुढेकर २७२३, डॉ. दीपक विखारे २७०३, अनिल दाभोळकर २६९५, अ‍ॅड. दिलीप दळी २६३६, रहिमान दलवाई २२०० मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष समीर टाकळे यांना १७६० मते, नवउदयचे संदीप साडविलकर यांना १२५५, अविनाश केळसकर १०३३, खालीद दाभोळकर ७२०, इम्तियाज परकार ५१६ मते मिळवून पराभूत झाले. महिला राखीव मतदार संघात नवउदयच्या सुरेखा खेराडे यांना २०७५ मते मिळाली. त्या पराभूत झाल्या, तर विद्यमान संचालिका राधिका पाथरे ४३७५ मते, तर गौरी रेळेकर ४३३० मते घेऊन विजयी झाल्या. अनुसूचित जाती, जमाती या मतदार संघात विद्यमान संचालक नवउदयचे विलास चिपळूणकर १०५३, अपक्ष संदीप चिपळूणकर ५३० मते मिळाली. हे दोघेही पराभूत झाले. या मतदार संघातून समीर जानवलकर हे ४४३३ मते मिळवून विजयी झाले. सहकार पॅनेलच्या विजयानंतर पॅनेलप्रमुख माजी आमदार बापू खेडेकर, माजी अध्यक्ष सुजय रेडीज, माजी उपाध्यक्ष उमेश काटकर, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले. संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर बँकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. सेनेची संधी हुकली सहकार पॅनेलने शिवसेनेला दोन जागा दिल्या होत्या. सेनेने त्या सन्मानाने स्वीकारल्या असत्या तर सेनेला बँकेमध्ये संधी मिळाली असती. परंतु, सेनेच्या काही उतावळ््या कार्यकर्त्यांमुळे ही संधी हुकली आणि सेनेवर हाताची घडी घालून बसण्याची वेळ आली. (प्रतिनिधी)