रत्नागिरी : रत्नागिरी आगारातील एका चालकाचा मृतदेह त्याच्या राहत्या भाड्याच्या खोलीत रविवारी दुपारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा चालक बीड येथील असून, नांदेड येथील कर्तव्य बजावून तो रत्नागिरीत आला होता. पांडुरंग संभाजीराव गडदे (३७, मूळ रा. बीड) असे त्याचे नाव आहे.त्या चालकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. गेले तीन महिने पगार न झाल्याने तो तणावाखाली होता, अशी माहिती पुढे आली आहे. दिवाळी जवळ आल्याने हातात पैसे नसल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून रत्नागिरी एस्. टी. विभागात वाहक-चालक म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग संभाजीराव गडदे हे एस्. टी. कॉलनीच्या मागील बाजूला असलेल्या चाळीत भाड्याने राहत होते. रविवारी सकाळपासून ते घराबाहेर पडले नव्हते. सायकांळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेजाऱ्यांनी पाहिला. त्यानंतर शहर पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यानंतर पांडुरंग गडदे यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. या मृतदेहाच्या अंगावर कपडे नव्हते. त्यामुळे पांडुरंग गडदे यांच्या सहकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला आहे. शवविच्छेदन केल्यानंतरच पांडुरंग यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी सर्व प्रकारे तपास सुरु केला आहे.
बीड येथील एस्. टी. चालकाची रत्नागिरीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 11:39 AM
रत्नागिरी आगारातील एका चालकाचा मृतदेह त्याच्या राहत्या भाड्याच्या खोलीत रविवारी दुपारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा चालक बीड येथील असून, नांदेड येथील कर्तव्य बजावून तो रत्नागिरीत आला होता. पांडुरंग संभाजीराव गडदे (३७, मूळ रा. बीड) असे त्याचे नाव आहे.
ठळक मुद्देबीड येथील एस्. टी. चालकाची रत्नागिरीत आत्महत्यातीन महिने पगार न झाल्याने तणावाखाली, रत्नागिरी पोलिसांचा तपास सुरु