शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

एस. टी. महामंडळाकडे मोठी दरवाढ, अ‍ॅपवर मात्र घसघशीत सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 2:01 PM

एस. टी. महामंडळाची तिकीटे त्यांच्या महामंडळापेक्षा अन्य ठिकाणी विशेष करून खासगी ठिकाणीच स्वस्त मिळू लागली आहेत आणि तीही काही एक वा दोन रुपयांनी नव्हे तर १००-१२५ रुपयांनी!

ठळक मुद्देएस. टी. महामंडळाकडे मोठी दरवाढ, अ‍ॅपवर मात्र घसघशीत सूटमुंबई मार्गावरील बसेसच्या दरात ८४ ते ११८ रुपयांचा फरक

विहार तेंडुलकररत्नागिरी : जेथे पिकतं, तेथे ते महाग मिळतं, असं म्हटलं जातं. पूर्वी हे काही वस्तूंच्या बाबतीत आणि खासगी क्षेत्रातच लागू होतं. मात्र आता ते शासकीय क्षेत्रातही हळूहळू लागू होत आहे. कारण एस. टी. महामंडळाची तिकीटे त्यांच्या महामंडळापेक्षा अन्य ठिकाणी विशेष करून खासगी ठिकाणीच स्वस्त मिळू लागली आहेत आणि तीही काही एक वा दोन रुपयांनी नव्हे तर १००-१२५ रुपयांनी!मध्यंतरी एस. टी. महामंडळाने १८ टक्के एवढी घसघशीत दरवाढ करून प्रवाशांचा खिसा रिकामा केला. त्यामुळे एकीकडे प्रवाशांची एस. टी. महामंडळावर नाराजी आहे. मात्र तरीही सुरक्षित सेवा असल्याने अनेक प्रवाशी आजही एस. टी. महामंडळाच्या बसेसमधूनच प्रवास करतात आणि आता एस. टी.नेही वातानुकुलित, शयनयान बसेस सुरु केल्याने प्रवासी पुन्हा या सेवेकडे वळू लागले आहेत.एस. टी. महामंडळाचे आरक्षण हे रेडबस, पेटीएम अशा मोबाईल अ‍ॅपवरही मिळत असले तरी अनेकजण एस. टी. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा बसस्थानकावर जाऊन करणे पसंद करतात. मात्र, एस. टी. महामंडळाच्या वेबसाईट वा प्रत्यक्ष बसस्थानकावर जाऊन आरक्षण केल्यास प्रवाशांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. कारण, सामान्यपणे एस. टी. महामंडळाच्या वेबसाईटवर वा तिकीट खिडकीवर कमी दरात आरक्षण मिळणे अपेक्षित होते. मात्र परिस्थिती याउलट आहे.पेटीएम, रेडबस अशा अ‍ॅपवर जाऊन जर एस. टी. महामंडळाच्या बसेसचे आरक्षण केल्यास ते स्वस्तात उपलब्ध होते तर महामंडळाकडे जाऊन आरक्षण केल्यास ते महाग पडते. फक्त खासगी अ‍ॅपवर जाऊन आरक्षण करायचे म्हटले तर ते ठराविक विशेष करून लांबपल्ल्याच्या गाड्यासाठीच करता येते.

मात्र असे असले तरी बोरिवली वा मुंबई सेंट्रल पर्यंतचा प्रवास एस. टी. बसने करायचा म्हटला तर एस. टी.ची वेबसाईट वा तिकीट खिडकीवरील दर आणि पेटीएम वा रेडबस या अ‍ॅपवरील दर यामध्ये ८४ ते ११८ रुपयांचा फरक पडतो. त्यामुळे, पिकते तेथे गोष्ट महागच मिळते, या सामान्यांच्या समजाला आता एस. टी. महामंडळाने खतपाणीच घातले आहे, असे म्हणावे लागेल.गाडी        एस. टी.    पेटीएम     रेडबसशिवशाही    ७१३         ५९५          ६३०शयनयान(मुुंबई)साधी गाडी   ४६९        ३८५         ३९५(बोरिवली)शिवशाही   ६९६           ५४०        ५३०(बोरिवली)

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरीShivshahiशिवशाही