रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी साध्य करता येईल, यासाठी सर्व संबंधीत घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये पालक, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहनधारक, संबंधित शाळा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलीस यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे, असे मत रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.शाळांमध्ये विद्यार्थी वाहतूक करतानाच्या सुरक्षिततेबाबत पालक, विद्यार्थी वाहतूक संघटनांचे पदाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालव व वाहतूक पोलीस अशी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी व्यासपीठावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.रत्नागिरी शहरात मान्यवर शिक्षण संस्थांच्या अनेक शाळा आहेत. सरकारी शाळाही आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या मोठी आहे. हे विद्यार्थी विविध खासगी वाहने, शाळांची वाहने याद्वारे घराहून शाळेत आणि शाळेतून परत घराकडे येतात. मात्र, विद्यार्थी वाहतुकीसाठी जिल्ह्यात, रत्नागिरी शहरात पुरेशी वाहने उपलब्ध नाहीत. तसेच अनेक पालकांना खासगी वाहनांचा खर्चही परवडत नसल्याचे सांगितले जाते.त्यामुळे कमी पैशात विद्यार्थ्यांना शाळेत नेणारे व सुखरूप घरी आणणाऱ्या वाहनांच्या शोधात पालक असतात. अशावेळी क्षमतेपेक्षा अधिक मुले वाहनांमध्ये बसवली जातात. त्यामुळे अपघाताची भीती असते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची बनली आहे. संबंधित सर्व घटकांमध्ये समन्वय असल्यास शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता चांगल्या प्रकारे राखता येईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.स्कूलबस घेणे अवघडविद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. त्यांनी या वाहतुकीसाठी नोंदणीही केली आहे. मात्र, सुरक्षित विद्यार्थी प्रवासासाठी रिक्षाधारकांनी स्कूल बसचा पर्याय स्वीकारावा, यासाठी वाहतूक यंत्रणेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सर्वच रिक्षाचालकांना स्कूलबसचा पर्याय मानवणारा नाही. बॅँकांचे सहकार्य त्यासाठी मिळवताना दमछाक होते. ज्यांना शक्य आहे ते हा पर्याय स्वीकारतील, असे विचार यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.ताळमेळच नाही : विभुतेरत्नागिरी शहरातील विद्यार्थी वाहतुकीचा आढावा घेतला तर विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, शाळा व पालक यांच्यात कोणताही ताळमेळ नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. विद्यार्थी वाहतूक करणारी खासगी वाहने किती? याची आकडेवारी नाही. खासगी वाहनांची जबाबदारी घेण्यास शाळा तयार नाहीत. त्यांना गाड्या वळविण्यास शाळेच्या जागेचा वापर करू देण्यासही नकार मिळतो. ही स्थिती बदलण्याची गरज आहे, असे मत वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी व्यक्त केले.
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची, रत्नागिरीत संयुक्त सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 5:44 PM
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी साध्य करता येईल, यासाठी सर्व संबंधीत घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची, रत्नागिरीत संयुक्त सभा सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीबाबत अनेकांच्या सूचना