शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

रत्नागिरीत पाेलिस बंदाेबस्तात पेट्राेलची विक्री

By शोभना कांबळे | Published: January 02, 2024 11:21 AM

रत्नागिरी : वाहन अपघात झाल्यास शहानिशा न करता त्या चालकाला दोषी धरून दहा वर्षे शिक्षा किंवा ५० हजार रुपयांच्या ...

रत्नागिरी : वाहन अपघात झाल्यास शहानिशा न करता त्या चालकाला दोषी धरून दहा वर्षे शिक्षा किंवा ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूर करणारा नवीन कायदा संसदेत येऊ घातला आहे. या कायद्याच्या निषेधार्थ सोमवारपासून सर्व वाहन चालकांनी संप पुकारला. या संपात टँकर चालक सहभागी झाल्याने रत्नागिरीत मिरजेहून येणारे टँकर अडकल्याने पेट्राेलची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील पेट्राेल पंपावर वाहनचालकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. पेट्राेल पंपावर काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे.याबाबत माहिती देताना फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (फामपेडा) चे पदाधिकारी उदय लोध यांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतर त्या चालकाला जामीनही न देता त्याना दहा वर्षे शिक्षा किंवा ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा करण्यात होणार आहे. हा कायदा संसदेत प्रस्तावित आहे. हा कायदा संमत झाल्यास संबंधित चालकाचा दोष आहे किंवा नाही, हे न पाहता त्याला अजामीनपात्र शिक्षेकरिता पात्र ठरविले जाणार आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात देशभरात निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व वाहन चालकांनी सोमवारपासून संपाला सुरुवात केली.रत्नागिरीत मिरज येथील तीन डेपोतून पेट्रोलचा पुरवठा केला जातो. रत्नागिरीत येणाऱ्या गाड्यांसाठी पैसे देण्यात आले आहेत. मात्र, वाहन चालकांच्या संपामुळे या गाड्या मिरज येथील डेपोसमोरच उभ्या आहेत. अद्याप या गाड्या भरलेल्या नसल्याने सोमवारी या गाड्या रत्नागिरीत आलेल्या नाहीत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला.संपाची माहिती नागरिकांमध्ये पसरताच इंधनाच्या तुटवड्याच्या भीतीने वाहन चालकांनी रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली. मात्र, पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे वाहन चालक प्रत्येक पेट्रोल पंपावर उशिरापर्यंत शोधाशोध करत हाेते. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांसमोर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. तर मंगळवारी सकाळपासूनच शहरातील पेट्राेल पंपावर वाहनचालकांनी गर्दी केली हाेती. त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या.पेट्राेल पंपावर काेणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी पाेलिस प्रशासनाने घेतली आहे. पेट्राेल पंपाबाहेर पाेलिस तैनात करण्यात आले असून, पेट्राेल पंपांना पाेलिसांची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. सकाळपासून पेट्राेलपंपाबाहेर पाेलिसांचा खडा पहारा हाेता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPetrolपेट्रोलPoliceपोलिस