रत्नागिरी : साळवी स्टॉपपासून हातखंबापर्यंतच्या बाजारपेठा, घरे उध्वस्त होणार असल्याने प्रस्तावित रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाविरोधात आज मंगळवारी कुवारबाव दशक्रोशीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
साळवी स्टॉप, जे.के.फाईल्स, टीआरपी, कुवारबाव, गयाळवाडी, कारवांचीवाडी, खेडशी, पानवल, हातखंबा बाजारपेठा पूर्णत: बंद ठेवण्यात आल्या होत्या. व्यापारी संघ व जनतेने चौपदरीकरणाविरोधात मोर्चाही काढला. या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शासनातर्फे प्रस्तावित असलेल्या मिºया ते कोल्हापूर-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात साळवी स्टॉप ते हातखंबा या मार्गावरील बाजारपेठा अधिक जागा घेतली जाणार असल्याने उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे या मार्गावर चौपदरीकरण होण्यासच कुवारबाव दशक्रोशीतून तीव्र विरोध केला जात आहे.
साळवी स्टॉप ते हातखंबा हा मार्गच राष्टÑीय महामार्गातून वगळावा आणि हातखंबा हे रत्नागिरीचे खºया अर्थाने प्रवेशद्वार व्हावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर साळवी स्टॉप, कुवारबाव, हातखंबापर्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.