शहरं
Join us  
Trending Stories
1
ताजिकिस्तानात २४ तासांत दोनदा जमीन हादरली; ६.१ रिश्टर स्केलच्या धक्क्यानं लोक घाबरले
2
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीने संपवलं जीवन, तळोजा कारागृहातील घटना 
3
कोण आहे मिस्ट्री वूमन, जी तहव्वूर राणाची बायको म्हणून भारतात राहत होती?; NIA चा शोध सुरू
4
..तर आयफोनसाठी खरच किडन्या विकाव्या लागतील? ३ लाखांपर्यंत जाणार किंमत? काय आहे कारण?
5
युक्रेनच्या फाळणीची तयारी...! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष दुतानं तयार केला प्लॅन; ठेवला धक्कादायक प्रस्तान
6
जामखेडच्या २ मित्रांनी संपवलं आयुष्य; एकाच झाडाला लटकलेले मृतदेह पाहून सगळेच हैराण
7
IPL 2025 : व्हॉट्सअ‍ॅप DP ला धोनीचा फोटो; मनी 'ध्रुव' ताऱ्यासारखं चमकण्याचं स्वप्न
8
‘मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती चिंताजनक, हिंदू होडीमधून करताहेत पलायन’, ममता बॅनर्जी सरकारवर चौफेर टीका 
9
न्यूनगंड अन् सोशल फोबिया; ओळखायचं कसं आणि काय करायचं?
10
शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम, शिक्षण विभागाचा नवीन आदेश काय?
11
लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे?
12
दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ
13
रुग्णालयांनी डिपॉझिट मागणे गैर नाही; पुणे मनपाच्या आदेशाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध
14
विशेष लेख : ...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायलाच हवी
15
अखेर चीनसमोर अमेरिकेचं एक पाऊल मागे? ट्रम्प सरकारने 'या' वस्तूंवरील टॅरिफ केला रद्द
16
सासू आणि जावयाच्या प्रेमकहाणीत आता तिसऱ्या व्यक्तीचीही एंट्री, समोर आली अशी माहिती  
17
श्रेया बुगडेच्या माहेरी खास पद्धतीने साजरी होते हनुमान जयंती, अभिनेत्री लिहिते- "हूप हूप असं म्हणत आमचे..."
18
सुनीलच्या खेळाची भुरळ पडायची अन् चेंडू हातून सुटायचा; अशोक सराफ यांनी जागवल्या आठवणी
19
भाजपा खासदाराच्या सुनेच्या कारची धडक बसून तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी मृतदेह घरासमोर ठेवून केलं आंदोलन 
20
भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १० कायदे अंमलात, राज्यपाल रवि यांना दणका

Ratnagiri: आजीच्या प्रेरणेने राजापुरातील समृद्धी बनली न्यायाधीश, तीन वर्षे सोशल मीडियापासून होती दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:56 IST

राजापूर : कष्ट करण्याची तयारी आणि मनात जिद्द असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही सहज साध्य करता येते, हे राजापुरातील ...

राजापूर : कष्ट करण्याची तयारी आणि मनात जिद्द असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही सहज साध्य करता येते, हे राजापुरातील समृद्धी प्रशांत नार्वेकर हिने दाखवून दिले आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीला कठोर परिश्रमाची जोड देत आजीकडून प्रेरणा घेऊन तिने पहिली महिला न्यायाधीश बनण्याचा मान मिळविला आहे.तिने बारावीनंतर कोल्हापूर येथे वकिलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे दोन वर्षात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षेत यश मिळविले. राजापूर तालुक्यात अशा प्रकारे न्यायाधीश होणारी ती पहिली न्यायाधीश ठरली आहे.या परीक्षेसाठी बसलेल्या ११४ विद्यार्थ्यांमध्ये समृद्धीने राज्यात तिसावा आणि मुलाखतीत ५०पैकी ३५ गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. राजापुरातील सुवर्णकार प्रशांत व प्रेरणा नार्वेकर यांची ती सुकन्या आहे. परीक्षा कालावधीत तिने राजापुरातील विधिज्ञ ॲड. मिलिंद चव्हाण यांच्याकडे क्रिमिनल केससाठी सरावही केला हाेता.

आजी सेवानिवृत्त न्यायाधीशसमृद्धी हिची आजी म्हणजे आईची आई श्रद्धा रांगणेकर या न्यायाधीश होत्या. त्या जिल्हा न्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपण याच क्षेत्रात करिअर करायचे, असे समृद्धीने निश्चित केले होते. आपल्या या यशात आजी श्रद्धा रांगणेकर, प्रगती नार्वेकर, वडील प्रशांत, आई प्रेरणा, भाऊ सामर्थ्य यांच्यासह गुरूजनांचा मोठा वाटा असल्याचे ती म्हणाली.

तीन वर्षे सोशल मीडियापासून दूरप्रारंभापासूनच न्यायाधीश बनण्याचे ध्येय आपल्याला गाठायचे आहे हे ठरविले होते. त्यासाठी मनापासून कठोर परिश्रम घेण्याचीही तयारी ठेवली होती. लॉच्या शेवटच्या वर्षात असताना व या परीक्षेची तयारी करत असताना तीन वर्षे पूर्णपणे मी माझा मोबाइल बंद ठेवला होता. केवळ आई-वडिलांना दिवसातून एकदा फोन कॉल करण्यासाठी सुरू करायचा. त्यानंतर बंद करायचा, असे तिने सांगितले. तीन वर्ष मी पूर्णपणे साेशल मीडियापासून दूर हाेते, असेही ती म्हणाली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालयRajapurराजापुर