खेड : तालुक्यातील वावे प्राथमिक आरोग्य
केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन केंद्रास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार साखर माध्यमिक विद्यालयात २० बेडचे आयसोलेशन केंद्र उभारण्यात येणार आहे.
गटविकास अधिकारी गुरुनाथ पारसे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत वावे येथे विभागातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, पंधरागाव विभाग ग्रामीण संघाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. २० बेडच्या आयसोलेशन केंद्रासाठी लागणाऱ्या सुविधांमध्ये शासनाकडून बेड, औषधे, डॉक्टर,
कर्मचारी उपलब्ध करण्यात येणार आहेत. रुग्णांची जेवण व्यवस्था स्वयंसेवी संस्था तसेच दानशूर व्यक्तींतर्फे करण्याचे नियोजन
करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांनीही सहकार्य केले आहे. या सेंटरसाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. याप्रसंगी पंधरागाव जनता सेवा संघ अध्यक्ष यशवंत म्हापदी, सचिव विष्णू कदम, कोषाध्यक्ष संतोष उतेकर, अनंत साळवी, प्रवीण सावंत, संतोष गुरुजी, सुर्वे, शैलेश, पालांडे वावे हॉस्पिटल डॉक्टर्स व कर्मचारी, विभागातील सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.