फोटो : बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्रात नूतन सभापती जयसिंग माने यांचा तेर्ये गावचे उपसरपंच प्रचित मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुजित महाडिक, माधवी गीते, डॉ. व्ही. आर. रायभोळे उपस्थित हाेते.
लाेेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर पंचायत समिती सभापती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जयसिंग माने यांनी शिमगाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची स्थिती जाणून घेऊन उपाययोजना करण्याकरिता संगमेश्वर तालुक्यातील आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे.
सध्या लसीकरण मोहीम सर्व केंद्रांवर सुरू झाली आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम कशाप्रकारे सुरू आहे, उपलब्धता, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आरोग्य केंद्र विषयक समस्या आदी बाबींची पाहणी त्यांनी यावेळी केली.
सभापती जयसिंग माने यांनी बुरंबी तेर्ये या आरोग्य केंद्रापासून बैठकीला सुरुवात केली. यानंतर सायले आरोग्य केंद्र, निवे आरोग्य केंद्र, देवळे आरोग्य केंद्र व संध्याकाळी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी ग्राम कृतीदल, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, मंडल अधिकारी यांना मार्गदर्शन करून सर्व आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेतला.