रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५५व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. प्रथम क्रमांक देवल स्मारक मंदिर, सांगलीने सादर केलेल्या संगीत शारदा नाटकासाठी जाहीर झाला आहे. रोख ७५ हजार रुपयांचे बक्षीस संस्थेला जाहीर झाले आहे. सलग दोन वर्षे रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेने प्रथम क्रमांक, तर गतवर्षी राधाकृष्ण संस्थेने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गेली तीन वर्षे रत्नागिरी केंद्रावर अंतिम स्पर्धेची फेरी सुरु होती. मात्र, यावर्षी सांगलीने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल केंद्र आता सांगलीकडे स्थलांतरीत होण्याची शक्यता आहे. स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक एमसीजीएम संगीत व कला अकादमी, मुंबई यांनी सादर केलेल्या ‘धाडिला राम तिने का वनी’ या नाटकाला प्राप्त झाला आहे. तृतीय क्रमांक राधाकृष्ण कला मंचतर्फे सादर करण्यात आलेल्या संगीत सुवर्णतुला नाटकाला प्राप्त झाला आहे. त्यांना अनुक्रमे ५० व २५ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत, स्पर्धेत काही वैयक्तिक बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत.दिग्दर्शनामध्ये प्रथम पारितोषिक, रोख २५ हजार रुपये, चंद्रकांत धामणीकर (संगीत शारदा), द्वितीय क्रमांक २० हजार सुवर्णगौरी घैसास (धाडिला राम तिने का वनी), नेपथ्याचे प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये, मुकुंद पटवर्धन (कट्यार काळजात घुसली), द्वितीय पारितोषिक १० हजार प्रशांत साखळकर (सुवर्णतुला), नाट्यलेखनाचे प्रथम पारितोषिक २० हजार रुपये सम्राज्ञी मराठे (अहम् देवयानी), द्वितीय पारितोषिक १५ हजार विद्या काळे (हारजीत), संगीत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक १५ हजार अनंत जोशी (शांतिब्रम्ह), द्वितीय पारितोषिक १० हजार जयश्री सबनीस (हारजीत), संगीत आॅर्गन प्रथम पारितोषिक १० हजार विशारद गुरव (बावन्नखणी), द्वितीय क्रमांक ५ हजार ओंकार पाठक (हारजीत), संगीत तबला प्रथम पारितोषिक १० हजार दत्तराज शेटे (एकच प्याला), द्वितीय पारितोषिक हेरंब जोगळेकर (सौभद्र) यांना जाहीर झाले आहे.संगीत व गायन स्पर्धेत रौप्यपदक व रोख ५ हजार रुपये, अनुप बापट सुवर्णतुला, मिलिंद करमरकर व अपर्णा हेगडे (धाडिला राम तिने का वनी), अंकिता आपटे (शारदा), उत्कृ ष्ट अभिनयामध्ये रौप्यपदक व ५ हजार रुपये प्रमोद मंद्रेकर (एकच प्याला), नितीन जोशी (कुरुमणी), निवेदिता पुणेकर (ययाती आणि देवयानी), कोमल कोल्हापुरे (लावणी भुलली अभंगाला) यांना जाहीर झाले आहे.गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र गायत्री कुलकर्णी (शारदा), शीतल सुवर्णा (सौभद्र), प्रेरणा दामले (सुवर्णतुला), जुई केकडे (हारजीत), सिद्धी शेलार (ययाती आणि देवयानी), चैतन्य गोडबोले (कट्यार काळजात घुसली), अभिजीत जोशी (सौभद्र), प्रवीण शीलकर (अहम् देवयानी), सिद्धेश जाधव (शांतिब्रह्म), सागर आपटे (संगीत शारदा) यांना देण्यात येणार आहे.अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र श्रद्धा जोशी (शारदा), यशश्री जोशी (कट्यार काळजात घुसली), गौतम कामत (मत्स्यगंधा), ऐश्वर्या फडके (सरस्वतीच्या साक्षीने), रसिका साळगावकर (ययाती आणि देवयानी), अभय मुळे (सुवर्णतुला), दीपक ओक (शांतिब्रह्म), केदार पावनगडकर (धाडिला राम तिने का वनी), समीर शिरोडकर (अयोध्येचा ध्वजदंड), विजय जोशी (सौभद्र) यांना देण्यात येणार आहे.स्पर्धा कालावधीत रत्नागिरी केंद्रावर ३१ संगीत नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चंद्रकांत लिमये, श्रीकांत दादरकर, कृ ष्णा जोशी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)रत्नागिरीला सात बक्षिसेगेली तीन वर्षे रत्नागिरीचा असलेला प्रथम क्रमांक यावर्षी हुकला आहे. रत्नागिरीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मात्र, रत्नागिरीला वैयक्तिक सात बक्षिसे प्राप्त झाली आहेत.
राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेेत सांगलीचे ‘संगीत शारदा’ प्रथम
By admin | Published: February 10, 2016 11:16 PM