रत्नागिरी : जीवनविद्या मिशन (खेड) आणि स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान, कोकण विभागातर्फे पर्यावरण दिनानिमित्त नागेश्वर देवस्थान येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़.
जीवनविद्या मिशन व स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानतर्फे नागेश्वर - वासोटा किल्ला भ्रमंती मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागेश्वर देवस्थान परिसरात स्वच्छता माेहीम हाती घेण्यात आली हाेती. नागेश्वर हे स्वयंभू देवस्थान रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे. महाराष्ट्रातून अनेक लोक याठिकाणी येत असतात. जळू आणि घनदाट जंगल हे येथील प्रमुख आकर्षण आहे. या मोहिमेतून पर्यावरण बचावचा संदेश देण्यात आला.
--------------------------
जीवनविद्या मिशन आणि स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान यांच्यातर्फे नागेश्वर देवस्थान परिसरात स्वच्छता माेहीम हाती घेण्यात आली हाेती. या माेहिमेत सदस्यांनी सहभाग घेतला हाेता.