रत्नागिरी : कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ही भाषा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी परिपूर्ण भाषा असल्याचे मत डॉ. बलदेवानंद सागर यांनी व्यक्त केले.गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमालेसाठी डॉ. सागर रत्नागिरीत आले आहेत. डॉ. सागर हे मूळचे गुजरातमधील असून, काशीमध्ये १९६५ ते ७१ या कालावधीत शिक्षण घेतले. १९७४ मध्ये एम्. ए. करत असताना दिल्ली आकाशवाणीमध्ये संस्कृत बातम्या देण्यासाठी भरती सुरू होती. अनुवाद, स्वरचाचणी व मुलाखतीद्वारे १००जणांमधून त्यांची निवड झाली. तेव्हापासून ते संस्कृत प्रचार, प्रसाराचे काम करत आहेत.त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, संस्कृत ही समृद्ध भाषा असून, २ हजार धातू, २२ उपसर्ग व २०० प्रत्यय असणारी ही भाषा आधुनिक काळातही तितकीच महत्त्वाची आहे. गणित आणि विज्ञान असणारी ही एक परिपूर्ण भाषा आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, एका संप्रदायाची ती भाषा असल्याचे सांगून त्याच्यावर मर्यादा आणल्याचे त्यांनी सांगितले. पण संस्कृत ही कोणत्या संप्रदायाची, वर्गाची, जातीची, प्रांताची भाषा नसल्याचे ते म्हणाले.सातव्या शतकामध्ये भगवान शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य व वल्लभाचार्यांनी संस्कृतमधूनच उपनिषद, ब्रह्मसूत्र, टिका, भाष्य, स्तोत्र, रचना लिहिल्या. त्या काळात संपूर्ण भारतात केवळ संस्कृत भाषेचाच उपयोग केला जात होता. त्या-त्या प्रांतात प्रादेशिक भाषा असल्या तरी भारताच्या कोणत्याही भागातला माणूस संस्कृतमध्ये एकमेकांशी संवाद साधत होता. काळानुसार संस्कृत भाषा थोडी मागे पडली असली तरी आता अनेकजण संस्कृत भाषेचा अभ्यास करत आहेत, ती शिकत आहेत. त्यामुळे ही भाषा कधीही लोप पावणार नाही. वैदिक संस्कृत व आधुनिक संस्कृत असे भाषेचे स्वरूप बदलत आहे, असे डॉ. सागर म्हणाले.टिळकांच्या जन्मभूमीमध्ये येण्याचा योगगोवा आणि नागपूरला जाण्याचा योग आला होता. कोकणात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. केसरी सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या या भूमीमध्ये येण्याचा योग आल्याने आनंद वाटला. केसरीच्या मुखपृष्ठावर संस्कृत श्लोक लिहून समाजात चेतना निर्माण करणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या जन्मभूमीला वंदन करण्याचे भाग्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 11:58 AM
कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ही भाषा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी परिपूर्ण भाषा असल्याचे मत डॉ. बलदेवानंद सागर यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देसंपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागरगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमाला