मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरीवीज, पाणी या मूलभूत गरजा आहेत. मात्र, त्यासाठीदेखील पैसे मोजावे लागत आहेत. जेवढा वापर अधिक तेवढा पैसा अधिक जातो. परंतु वापरामध्ये जशी बचत केली जाते, त्याप्रमाणे निर्मितीसाठी प्रयत्न केल्यास संबंधित ग्राहकांना अन्यत्र पैसे मोजावे लागत नाहीत. किंबहुना पैशांची बचत होते. शहरातील एका खासगी रूग्णालयाने सौरऊर्जा प्रकल्पाचे एक युनिट बसविले असून, त्यांना त्याव्दारे दरमहा २२५ युनिट वीज उपलब्ध होते. तसेच औषधालयामध्ये पवनचक्की प्रकल्प उभारल्याने त्यांना १५० युनिट वीज सहज उपलब्ध होते. एकूणच संबंधित मंडळीनी ऊर्जानिर्मितीची छोटी उपकरणे बनवून स्वत:च्या गरजेपुरती वीजनिर्मिती सुरू केली आहे. यामुळे महावितरणला द्याव्या लागणाऱ्या पैशांची बचत होतेच शिवाय वापरावरही निर्बंध घालून घेतले आहेत.शहरातील डॉ. गिरीश करमरकर यांचे स्वत:चे इस्पितळ आहे. रूग्णालयासाठी दरमहा ९०० ते ९५० युनिट वीज लागते. त्यासाठी महावितरण कंपनीला बिलापोटी हजारो रूपये मोजावे लागतात. यावर उपाय म्हणून डॉ. करमरकर यांनी सोलर ऊर्जानिर्मिती उपकरण बसविले आहे. त्याव्दारे त्यांना २१० ते २५० युनिट वीज उपलब्ध होते. शिवाय त्यांनी पवनचक्कीदेखील उभारली आहे. मात्र, वाऱ्याअभावी पवनचक्कीव्दारे केवळ दहा युनिट वीज निर्मिती होते. एकूणच करमरकर यांना स्वयंनिर्मितीमुळे २५० ते २६० युनिट वीज उपलब्ध होते. साहजिकच यामुळे बिलाचे हजारो रूपये वाचतात.रूग्णालयातील पंखे व दिवे सौरऊर्जेवर चालविण्यात येतात. मात्र, अत्यंत तातडीच्या अशा आॅपरेशन थिएटर्स व अन्यत्र महावितरणची वीज वापरली जाते. वाऱ्याअभावी पवनचक्की उपकरणातून कमी वीज उपलब्ध होते असल्याचे डॉ. करमरकर यांनी सांगितले. बहुतांश रूग्णालयांनी केवळ पाणी तापवण्यासाठी सौरऊर्जा उपकरण बसविण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे उपकरण बसवल्यामुळे करमरकर यांची बचत झाली आहे.सायंटिफीक मेडीकलचे सतीश जोशी यांनी तर पवनचक्की उपकरण बसविले आहे. त्यांना दररोज ५ युनिट वीज पवनचक्कीव्दारे उपलब्ध होते. काही औषधे फ्रीजमध्ये ठेवावी लागतात. त्यांना दरमहा ३५० युनिट वीज लागते. महावितरणकडून घेण्यात येणाऱ्या विजेला वाणिज्य दराने प्रत्येक युनिटला ९ ते १० रूपये मोजावे लागतात. परंतु पवनचक्कीमुळे १५० युनिट वीज उपलब्ध होते. त्यामुळे २०० युनिट वीज त्यांना महावितरणकडून विकत घ्यावी लागते. वारा कमी उपलब्ध होत असल्यामुळे तितकीशी वीजनिर्मिती होत नाही. केवळ चार तास वारा मिळत असल्याने वीजनिर्मिती कमी होते. पावसाळ्यातील ढगाळ हवामानामुळे सौरऊर्जा निर्मितीवर परिणाम होतो. वास्तविक औषधालये वा रूग्णालयांसाठी २४ तास विजेची गरज असते. परंतु अपारंपरिक ऊर्जास्त्रोतावर ऊर्जा निर्मिती केली तर नक्कीच पैशाची बचत होत असल्याचे करमकर व जोशी यांनी दाखवून दिले आहे. रत्नागिरी शहराला दररोज ४० मेगावॅट तर दरमहा १२० मेगावॅट वीज लागते. विजेच्या वापरावरील निर्बंध ही मुख्य बाब असली तरीही पारंपरिक ऊर्जानिर्मितीतून ग्राहकांचा फायदा होऊ शकतो. जोशी व करमरकर यांच्या मते सौरऊर्जा व पवनचक्कीतून वीजनिर्मिती होणारे प्रकल्प फायदेशीर असून, शहरातील विविध रूग्णालये किंवा, कार्यालयांनी या प्रकारची वीजनिर्मिती केली तर नक्कीच लाभदायक आहे. शिवाय शासकीय मालमत्तेचीही बचत होईल. या साऱ्यासाठी पारंपरिक ऊर्जानिर्मितीमुळे अनेक स्तरांवर फायदा होणार आहे.४पैशांची बचत करायला त्यांनी शिकविले. ४एका खासगी रूग्णालयाने निर्माण केला सौरऊर्जा प्रकल्प. ४ऊर्जानिर्मितीची छोटी उपकरणे बसवून समोर ठेवला काटकसरीचा आदर्श. ४वीज काटेकोरपणे वापरा हाच संदेश. ४पैशांची बचत; त्याचबरोबर उत्पादनक्षमताही वाढेल. ४बिलाचे हजारो रूपये वाचविण्यात त्यांना मिळतेय यश.
पारंपरिक ऊर्जानिर्मितीतून बचत
By admin | Published: October 31, 2014 12:20 AM