संजय हर्डीकर
रत्नागिरी : शहरातील संजय एजन्सीज दुकानाचे मालक संजय हर्डीकर (५६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दाेन वर्षांपासून ते आजारी हाेते. श्री पतितपावन मंदिर संस्थेतही ते कार्यरत हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, माेठा भाऊ, वहिनी व पुतण्या असा परिवार आहे.
आत्माराम शिंदे
चिपळूण : तालुक्यातील गाेवळकाेट येथील प्रगतशील शेतकरी आत्माराम विठाेबा शिंदे (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दाेन मुलगे, सुना, चार भाऊ, चार बहिणी, नातवंडे असा परिवार आहे.
सुदर्मा आरेकर
गुहागर : गुहागर एज्युकेशन साेसायटीचे पदसिद्ध संचालक सुदर्मा उर्फ बनाशेठ आरेकर (५४) यांचे चिपळूण येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते आमदार भास्कर जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
महेंद्र कदम
चिपळूण : आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्र धर्मा कदम (५९) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांनी २० वर्षे गावचे सरपंचपद भूषविले आहे. ते रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्षही हाेते.
समीर साळवी
रत्नागिरी : शहरातील परटवणे - कुंभारवाडीतील प्रसिद्ध मूर्तिकार समीर साळवी (४२) यांचे निधन झाले. त्यांचा पिढीजात मूर्ती बनविण्याचा कारखाना अद्याप सुरू आहे. त्यांचे किराणा मालाचे दुकान तसेच पिठाची गिरणी आहे.
अच्युत फडके
रत्नागिरी : शिक्षण सुधारक समिती, कुर्धे (ता. रत्नागिरी)चे कार्यवाह व भारत शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अच्युत शंकर फडके (८४) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांनी ३५ वर्षे पटवर्धन हायस्कूल येथे वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात दाेन मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.
उदय मुळ्ये
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील काेळंबे येथील रहिवासी उदय मधुकर मुळ्ये (६०) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते विद्याप्रसारक मंडळ, काेळंबेचे संस्था सदस्य हाेते. ते रत्नागिरीतील वकील उन्मेश मुळ्ये यांचे वडील हाेत.
राजाराम थाेरे
दाभाेळ : दापाेली अर्बन बॅकेचे माजी संचालक राजाराम गणपत थाेरे (६५, रा. टाळसुरे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते टाळसुरे कृषी युवा संघटनेचे अध्यक्ष हाेते. त्याचबराेबर विविध संस्थांवर त्यांनी काम केले हाेते. पंचक्राेशीतील अनेक तरुणांना त्यांनी राेजगार मिळवून दिला हाेता.
सुनंदा पाटणे
खेड : शहरातील प्रसाद सुधाकर पाटणे यांच्या आई सुनंदा सुधाकर पाटणे (७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.